अमरावती जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये महाआघाडीच भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2023 17:51 IST2023-04-28T21:49:43+5:302023-04-29T17:51:13+5:30
यामध्ये तिवसा बाजार समितीत आमदार यशोमती ठाकूर यांचे सर्व उमेदवार निवडून आले.

अमरावती जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये महाआघाडीच भारी
अमरावती : जिल्ह्यात सहा बाजार समितीची निवडणूक शुक्रवारी झाली. यामध्ये अमरावती वगळता अन्य पाच बाजार समितीची मतमोजणी रात्री उशीरापर्यंत सुरु होती. आगामी विधानसभेची रंगीत तालिम या अर्थाने झालेल्या या निवडणुकीत महाआघाडी समर्थित पॅनलले सर्वच बाजार समित्यांमध्ये घवघवीत यश मिळविले आहे.
यामध्ये तिवसा बाजार समितीत आमदार यशोमती ठाकूर यांचे सर्व उमेदवार निवडून आले, चांदूर रेल्वेत माजी आमदार विरेंद्र जगताप मोर्शी येथे हर्षवर्धन देशमुख, आ. यशोमती ठाकूर व आ. देवेंद्र भुयार गटाचे १० संचालक विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजप व सहकारी पॅनलचा पराभव झालेला आहे. अमरावती बाजार समितीसाठी शनिवारी मतमोजणी होणार आहे.