शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीपात्रातील वाळूची नियबाह्यरित्या अफरातफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 10:56 IST

शासकीय यंत्रणा अद्यापही अनभिज्ञच : केव्हा रोखणार गैरप्रकार

संदीप राऊत लोकमत न्यूज नेटवर्क तिवसाः तालुक्यातील नदीपात्रातून चोरट्या मार्गाने अवैध वाळूची वाहतूक ही काही नवलाची बाब नाही. परंतु काही दिवसांपूर्वी याच अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यात महसूल प्रशासनाला यश आले होते. व अवैध गौण खनिज वाहतुकीवर सर्वाधिक कारवाया करण्यात महसूल प्रशासनाने अव्वल स्थान गाठले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील नदीपात्रातून बेधडकपणे अवैधरित्या वाळूची वाहतूक करण्यात येत आहे.

जवळपास दोन महिन्यांपासून शासकीय यंत्रणा विधानसभा निवडणूक कार्यात व्यस्त असल्याने वाळू चोरट्यांना रान मोकळे झाले होते. त्याचाच फायदा घेऊन वाळू चोरट्यांनी आपला मोर्चा वाळूघाटाकडे वळवून नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरू केली. परंतु आता निवडणुकीचा हंगाम ओसरला आहे तेव्हा आतातरी शासकीय यंत्रणा या गैरप्रकाराकडे लक्ष देतील काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

तालुक्यातील नदीपात्रात अद्यापही मोठ्या प्रमाणात वाळूसाठा उपलब्ध आहे. तसेच वाळूचे दर गगनाला भिडले असल्यामुळे अवैध वाळू वाहतुकीतून झटपट माया गोळा करण्यासाठी रात्रीचा दिवस करून वाळू चोरट्यांकडून शहरासह ग्रामीण भागात चढ्या दराने वाळू विक्री करण्यात येत आहे. नदीपात्रातून दैनंदिन शेकडो ब्रास वाळूची अफरातफर होत असल्यामुळे शासनाच्या महसुलाची अक्षरशः लूट होत आहे. 

वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारे प्रतिबंध लावण्यात आले होते परंतु त्या खचखडग्यांवर मात करून वाळू चोरट्यांनी नदीपात्रात जाण्याचा मार्ग सुकर केला. व खुलेआम वाळू उत्खनन करून बेभानपणे वाळू वाहतूक सुरू करून एकप्रकारे शासकीय यंत्रणेलाच आवाहन दिल्याचे दिसून येत आहे. 

पोलिसांची कारवाई थंडावली वास्तविक पाहता अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला चाप लावणे महसूल यंत्रणेचे काम आहे परंतु याबाबत पोलिस यंत्रणाही नेहमी सजग असते. मात्र, पोलिसांनीही या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

"लवकरच बंदोबस्त करण्यात येईल. शासकीय यंत्रणा निवडणूक कार्यात व्यस्त असल्याचा फायदा वाळू चोरट्यांनी घेतला असेल परंतु यापुढे पाळत ठेवून चोरट्यांना आवर घालण्यात येईल." - मयूर कळसे, तहसीलदार तिवसा

टॅग्स :sandवाळूmafiaमाफियाAmra Bengaliआमरा बंगाली