कमालपुरात आढळला तोतया डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 06:00 IST2020-03-27T06:00:00+5:302020-03-27T06:00:53+5:30
तालुका आरोग्य अधिकारी सुधीर कृष्णराव डोंगरे (५३) यांनी याबाबत २५ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास त्या तोतयाविरूद्ध तक्रार नोंदविली. कमालपूर येथे एक व्यक्ती विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची माहिती डोंगरे यांना मिळाली. याची शहानिशा करण्यासाठी डॉ. शुभम भरणे यांना कमालपूर येथे पाठविले. ते तेथे पोहोचले असता आरोपी विपूल हा तेथे वैद्यकीय व्यवसाय करताना दिसला.

कमालपुरात आढळला तोतया डॉक्टर
लोकमत न्यूज नेटवर्क
खल्लार/अंजनगाव सुर्जी : कोणतीही डिग्री नसताना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करणाऱ्या तोतया डॉक्टरविरूद्ध खल्लार पोलिसांत गुन्हे नोंदविण्यात आले. २४ मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. विपुल सुशांत मलिक (२६, रा. देवलाडी, जि. वर्धा), असे तोतया डॉक्टरचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी सुधीर कृष्णराव डोंगरे (५३) यांनी याबाबत २५ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास त्या तोतयाविरूद्ध तक्रार नोंदविली. कमालपूर येथे एक व्यक्ती विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची माहिती डोंगरे यांना मिळाली. याची शहानिशा करण्यासाठी डॉ. शुभम भरणे यांना कमालपूर येथे पाठविले. ते तेथे पोहोचले असता आरोपी विपूल हा तेथे वैद्यकीय व्यवसाय करताना दिसला. त्याला वैद्यकीय डिग्री व परवान्याबाबत विचारणा केली. मात्र, आपल्याजवळ त्यापैकी काहीही नसल्याची कबुली त्याने दिली. तथाकथित दवाखान्यात असलेल्या औषधांचे बिलही तो सादर करू शकला नाही. त्यामुळे त्याच्याकडील ३ ते ४ हजार रुपयांची औषधी जप्त करण्यात आली. त्याचेविरूद्ध भादंविचे कलम ४१९ व महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिस अॅक्टच्या आर डब्ल्यू ३३, ३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.