शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

महिलांना ढाल करून अवैध दारूविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 22:09 IST

पैसे कमाविण्याच्या नाईलाजाने अवैध दारूविक्री करणाऱ्या महिलांची संख्या शहरात बरीच असल्याचे शहर पोलिसांकडून अलीकडच्या काळात नोंदविलेल्या गुन्ह्यांतून स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देउदरनिर्वाहाचे साधन : कारवाईसाठी पोलिसांचा हात आखडता

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पैसे कमाविण्याच्या नाईलाजाने अवैध दारूविक्री करणाऱ्या महिलांची संख्या शहरात बरीच असल्याचे शहर पोलिसांकडून अलीकडच्या काळात नोंदविलेल्या गुन्ह्यांतून स्पष्ट झाले आहे. आठवडाभरात अवैध दारूविरोधात कारवाई करताना शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तब्बल पंधरा महिलांविरुद्ध कलम ६५ (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदविले गेले आहेत.शहरात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाया होत असतात. शेकडो नागरिक अवैध दारूविक्री व्यवसायात गुंतले आहेत. अलीकडे मात्र पोलिसांच्या कारवायांमधून मुख्य आरोपी म्हणून महिलांचे नाव उमटत आहे. निम्न मध्यमवर्गीय किंवा झोपडपट्टी परिसरात सर्वाधिक अवैध दारूव्यवसाय चालविल्या जात असल्याचे निरीक्षण आहे. पूर्वी अवैध दारूविक्री व्यवसायात केवळ पुरुषांचाच सहभाग राहायचा. मात्र, गेल्या काही वर्षांत या व्यवसायात महिलांचाही सहभाग वाढला आहे. दारूविक्री व्यवसाय करणारी पुरुष मंडळी स्वत: त्याच्या आहारी जातात. अशातून त्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण होतो. कुटुंबप्रमुखाची जबाबदारी घरातील महिलेवर येते. पती गेल्यानंतर मोलमजुरी करावी की त्याचा गुत्ता चालवावा, असे प्रश्न तिच्यापुढे उभे ठाकतात. या व्यवसायात महिलांचा शिरकाव होण्यास बड्या मद्यविक्रेत्यांचे दलाल व मद्यपींचे गैरवाजवी सल्लेदेखील कारणीभूत ठरतात. एकदा महिलेने अवैध दारूविक्रीत पाऊल टाकले, की तिच्याकडून उधारीत दारू पिण्याची वा गुन्हेगारीसाठी मोकळीक मिळण्याची अपेक्षाही या ‘सल्ल्यां’मागे असते. दारू व्यवसायात पैसा पाहून महिलांनासुद्धा मोलमजुरी कंटाळवाणी वाटते. मात्र, पोलीस कारवाई सुरू झाली की, त्यांना परिस्थितीची जाणीव होते. अशा स्थितीतही पोलिसांशी हुज्जत घालण्याचे धाडस त्या दाखवितात. मात्र, कायदा व सुव्यवस्थेची धुरा सांभाळणारे महिलांची हयगय करीत नसल्याचे वास्तव आहे.‘मोठे मासे’ केव्हा लागणार गळाला?शहरातील अवैध दारू विकणारे माल आणतात कोठून, ही बाब जगजाहीर असते. शहरातील मोठ्या व्यावसायिकांकडूनच ते दारू खरेदी करतात, ही बाब पोलीस प्रशासनासह जनसामान्यांना माहिती आहे. मात्र, आजपर्यंत यामध्ये गुंतलेल्या मोठ्या व अधिकृत दारूविक्रेत्यांवर कधीच कारवाईचा बडगा उगारला गेला नाही. अवैध दारूविक्रेत्यांना तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले जातात; मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.दलाल महिलांना ढकलतात दारू व्यवसायातनिराधार वा विधवा महिलांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन पुरुष दलाल त्यांना या अवैध दारूविक्रीच्या व्यवसायात ढकलतात. दारूविक्रीतून होणाऱ्या नफ्याचे आमिष त्यांना दाखविले जाते. अडचणीत असलेल्या महिलांना कधी कौटुंबिक, तर कधी सामाजिक सुरक्षेच्या कारणावरून या व्यवसायात उडी घ्यावी लागते. एकदा या व्यवसायातील खाचाखोचा माहिती झाल्यानंतर त्यांना यामधून बाहेर पडता येत नाही.पोलिसांकडून या ठिकाणी कारवाईशहरातील वडाळी व पारधी बेड्यावर सर्वाधिक अवैध दारू विकणारे असल्याचे आजपर्यंतच्या पोलीस कारवाईवरून निदर्शनास येते. वडाळी परिसरातील परिहारपुरा, पिंपळखुटा, शेंदोळा येथील पारधी बेडा, रहाटगाव झोपडपट्टी, माधवनगर, आनंदनगर, महाजनपुरा, म्हाडा कॉलनी, दसरा मैदानाजवळील झोपडपट्टीसह अन्य काही परिसरात महिलांविरुद्ध अवैध दारूविक्रीप्रकरणी पोलिसांनी कारवाई गुन्हे नोंदविले आहेत.पोलीस महिलांवर कारवाई करण्यास धजावत नाहीत, असा समज करून काही पुरुष दारूविक्रीसाठी महिलांना पुढे करतात. तथापि, पोलिसांकडून पुरुषांसह महिलांवरही कारवाई करण्यात येते. पुरुष दारूचा माल आणून देतात व महिला विक्री करीत असल्याचे आढळले आहे.- यशवंत सोळंकेपोलीस उपायुक्त