राशीच्या प्रसादालाही महत्त्व
By Admin | Updated: September 2, 2014 23:24 IST2014-09-02T23:24:13+5:302014-09-02T23:24:13+5:30
गौरी स्थापना वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आली आहे़ विहिरीवरून तिला वाजत-गाजत आणणे, घरच्या सर्व भागात फिरवीणे, प्रत्येक ठिकाणी पावले काढणे, एखाद्या वाटीत पाच किंवा सात खडे आणून

राशीच्या प्रसादालाही महत्त्व
अमरावती : गौरी स्थापना वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आली आहे़ विहिरीवरून तिला वाजत-गाजत आणणे, घरच्या सर्व भागात फिरवीणे, प्रत्येक ठिकाणी पावले काढणे, एखाद्या वाटीत पाच किंवा सात खडे आणून गौरींची पूजा करणे, या सर्वांपेक्षा विदर्भात महालक्ष्मी म्हणून उभ्या करून हा सणाला सुरूवात झाली आहे़ काही ठिकाणी नुसते मुखवटे तर काहींच्या घरी बैठ्या गौरी असतात तर अनेक कुटूंबात महालक्ष्म्याला पितळी किंवा लाकडी तथा लोंखडी स्टँडवर उभ्या करतात़ काही ठिकाणी देवीचे हात कापडाचे तर पितळीचे तसेच लाकडाचे असतात़ अनेक ठिकाणी हात नसल्याची सुध्दा पध्दत आहे़
दोन गौरींना जेष्ठा व कनिष्ठा असे संबोधून दोघींच्यामध्ये एक बाळही ठेवतात गव्हाच्या व तांदळाच्या राशी तिच्यापुढे मांडण्यात आले नवीन साड्या, नवीन मुकूट, गळ्यातील अलंकार, बागड्या, साड्यांचा असा सर्व नवा थाट पाहून डोळ्यांची पारणे फिटते़ साड्या, गहु, तांदुळाची रास, ओटी, फराळाचे पदार्थ, समोर ठेवण्यात येत असले तरी पहिल्या दिवशी अशा समृध्दीने सजलेली महालक्ष्मी तथा गौरी ही भाजी व भाकरीच्या नैवद्याने तृप्त होते़ पहिल्या दिवशी जागराणाने रात्र काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी आज दुपारी अथवा सायंकाळी महालक्ष्मींना बंद दार जेवण देण्यात येणार आहे़ अक्षरशा: वाढलेल्या प्रसादात बोटांचे ठसे दिसत असल्याची अनुभूती येत असल्याचे अनेकांनी सांगीतले़ या दिवशी आंबील व प्रसादाला अधीक महत्व असते़ तिसऱ्या दिवशी राशी चा प्रसाद या कुटूंबात मित्र परीवारांना देण्यात येते़