कुळवहिवाटीच्या सुधारणा ७ फेब्रुवारीपासून अमलात

By Admin | Updated: May 15, 2014 23:08 IST2014-05-15T23:08:23+5:302014-05-15T23:08:23+5:30

कुळ हक्काने मिळालेल्या जमिनीची विक्री करण्यापूर्वी यांची पूर्व परवानगी घेण्याची तरतूद सन २0१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ अन्वये सुधारीत करण्यात आली आहे.

Implementation of the clan will begin from Feb. 7 | कुळवहिवाटीच्या सुधारणा ७ फेब्रुवारीपासून अमलात

कुळवहिवाटीच्या सुधारणा ७ फेब्रुवारीपासून अमलात

अमरावती : कुळ हक्काने मिळालेल्या जमिनीची विक्री करण्यापूर्वी यांची पूर्व परवानगी घेण्याची तरतूद सन २0१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ अन्वये सुधारीत करण्यात आली आहे. शासन राजपत्रात हा अधिनियम ७ फेब्रुवारी २0१४ अन्वये प्रसिद्ध होऊन त्याच दिवसी लागू करण्यात आला. या अन्वये कुळ वहिवाटीच्या जमिनीचा व्यवहार करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या पूर्व परवानगीची तरतूद काही अटीवर शिथील करण्यात आली आहे. उपरोक्त जमीन महसूल आकारणीच्या ४0 टक्के रकमेचा शासन भरणा करून या जमिनीचा व्यवहार आता करता येणार आहे. यासाठी तहसीलदार स्तरावर याचे अधिकार देण्यात आले आहे.

मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन (विदर्भ विभाग) अधिनियम १९५८ च्या पोटकलमानुसार ज्या जमिनीच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकापासून १0 वर्षाचा काळ लोटला असेल अश्या जमिनीच्या बाबतीत तिची विक्री, देणगी, अदलाबदल किंवा गहाण ठेवण्याकरिता ती पट्टय़ाने देण्याकरिता, तिचे अभिहस्तांकन करण्याकरिता काही अटी व शर्थीच्या अधिन राहून जिल्हाधिकार्‍यांच्या पूर्वपरवानगीची गरज राहणार नाही याविषयी महसूल विभागाने ७ मे २0१४ आदेश जारी केले आहे.

कुळ कायद्यानुसार कुळहक्क मान्य होऊन ज्या जमिनी कुळांनी खरेदी केल्या आहेत त्या संबंधित शेतकर्‍याच्या सातबारा उतार्‍यावर नियंत्रित सत्ता प्रकार म्हणून असलेल्या नोंदी सुधारीत करणे व या सुधारणा तरतुदीची प्रभावीरित्या अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय अधिकार्‍यांना सदर जमीन महसूल आकारण्याचीच्या ४0 पट नजराणा रक्कम भरून घेण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Implementation of the clan will begin from Feb. 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.