विद्यापीठात ऑनलाईन नामांकन, परीक्षा फार्म प्रणाली लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST2021-02-05T05:28:05+5:302021-02-05T05:28:05+5:30

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये ३ फेब्रुवारीपासून ऑनलाईन नामांकन, परीक्षा अर्ज प्रणाली लागू करण्यात येत आहे. ...

Implement online enrollment, examination form system in the university | विद्यापीठात ऑनलाईन नामांकन, परीक्षा फार्म प्रणाली लागू

विद्यापीठात ऑनलाईन नामांकन, परीक्षा फार्म प्रणाली लागू

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये ३ फेब्रुवारीपासून ऑनलाईन नामांकन, परीक्षा अर्ज प्रणाली लागू करण्यात येत आहे. विद्यापीठात पहिल्यांदाच लागू होणाऱ्या या प्रणालीविषयी सोमवारी प्राचार्य, विभागप्रमुखांना पत्र पाठविण्यात आले.

विदयार्थ्यांना नामांकन अचूक भरण्यासाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्रे महाविद्यालयातूनच भरावे लागतील. त्याकरिता महाविद्यालयांना लॉगीन आयडी, पासवर्ड उपलब्ध होणार आहे. नामांकन ऑनलाईन नोंदणी करताना विद्यार्थ्याच्या ई-मेल आयडी हाच कायम राहील. महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे अचूक विषय भरावे लागतील. नामांकन प्रक्रिया आटोपल्यानंतर महाविद्यालयांना नामांकनाची यादी शुल्कासह विद्यापीठात सादर करावी लागेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा फार्म महाविद्यालयाने वितरित केलेला लॉगीन आयडी आणि पासवर्डद्वारेच भरावा लागणार आहे. विद्यापीठाने तयार केलेल्या विद्यार्थ्यांचे नियमित लॉगीन आयडी आणि पासवर्ड महाविद्यालयांना त्यांच्या पोर्टलमध्ये लॉगीन करून विद्यार्थ्यांना लॉगीन आयडी आणि पासवर्ड स्टुडंड लॉगीन डिटेल्स या पॅनेलवरून परीक्षानिहाय उपलब्ध करावे लागेल. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा अर्ज दाखल केल्यास आवेदनपत्राची प्रत परीक्षा शुल्कासह महाविद्यालयात जमा करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा अर्ज परीक्षासाठी लॉगीन आयडी अथवा पासवर्ड मिळाला नसल्यास अशांनी महाविद्यालयातून पासवर्ड, आयडी उपलब्ध करून घ्यावा, असे पत्राद्वारे कळविले आहे.

------------------

विद्यार्थ्यांची नोंदणी अनिवार्य

ऑनलाईन परीक्षा अर्जासाठी महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची नोंदणी अनिवार्य केली आहे. हिवाळी-२०२० परीक्षांचे आवेदनपत्रे त्याशिवाय भरता येणार नाही. नोंदणी करताना विद्यार्थ्यांचे लॉगीन आयडी, पासवर्ड टाकणे आवश्यक आहे. हिवाळी-२०२० परीक्षांचे ऑनलाईन परीक्षा अर्ज स्वीकारले जातील. केवळ बॅकलॉग विद्यार्थ्यांचे ऑफलाईन परीक्षा अर्ज घेण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

-------------------

कोट

पहिल्यांदाच ऑनलाईन नामांकन, परीक्षा अर्ज प्रणाली सुरू होत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे माहिती मागविली आहे. विद्यार्थ्यांना लॉगीन आयडी, पासवर्ड महाविद्यालयातूनच उपलब्ध होणार आहे. आता वारंवार अर्ज भरण्याची गरज नाही.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ. अमरावती.

Web Title: Implement online enrollment, examination form system in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.