हवामान बदलाचा मान्सूनवर परिणाम
By Admin | Updated: July 12, 2014 23:25 IST2014-07-12T23:25:44+5:302014-07-12T23:25:44+5:30
ग्लोबल वार्मिंगच्या संकटाने हवामानात बदल घडून आला. त्याचा प्रभाव मान्सुनवर झाला. यंदाच्या पावसात अनियमितता दिसत आहे. हाच प्रभाव देशपातळीवरील सामाजिक व आर्थिक स्थितीवर होत,

हवामान बदलाचा मान्सूनवर परिणाम
वैभव बाबरेकर - अमरावती
ग्लोबल वार्मिंगच्या संकटाने हवामानात बदल घडून आला. त्याचा प्रभाव मान्सुनवर झाला. यंदाच्या पावसात अनियमितता दिसत आहे. हाच प्रभाव देशपातळीवरील सामाजिक व आर्थिक स्थितीवर होत, असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले.
भारतीय उपखंडात दरवर्षी जून ते सप्टेंबरपर्यंतच्या चार महिन्यात पाऊस पडतो. यालाच मान्सूनचा पाऊस संबोधले जाते. मान्सूनचा काटेकोरपणे अंदाज तज्ज्ञांना काढता नाही. याबाबत तंतोतंत माहिती मिळू शकत नाही. या शतकात मान्सूनच्या अभ्यासाला वेग आला असून मान्सूनचा पूर्वानुमान देण्याची पध्दत दिवसेंदिवस विकसित होत आहे. त्यामुळे मान्सूनची भविष्यवाणी करणे काही प्रमाणात शक्य झाले आहे. यावर्षी टोलनिनो सक्रिय राहण्याचा अंदाज अनेक संस्थांनी वर्तविला आहे. त्याचबरोबर जागतिक हवामान बदलामुळे यंदाचा मान्सून बेभरवशाचा असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत हिमालयाच्या पायथ्याशी कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पूर्व-पश्चिम वाऱ्याच्या प्रवाहात अनियमितता आहे. त्यामुळे येत्या दोन - तीन दिवसांत पाऊस येणाची शक्यता आहे. परंतु पूर्व-पश्चिम अनियमिततेमुळे खंडित पावसाची शक्यता आहे. तरीसुध्दा जुलैमध्ये बऱ्यापैकी पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत पेरणी आटोपल्यास शेतकऱ्यांना नुकसान टाळता येईल, असे शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.