लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा (अमरावती):मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील पाच आरोग्य केंद्रांमध्ये आठवड्याच्या आत बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या जागा तत्काळ भरण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. बालमृत्यूमध्ये वाढ झाल्याच्या मान्य करीत मेळघाटातील सर्व जागा भरल्या जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने मान्य करीत गुरुवारी बहुप्रतीक्षित अहवाल सादर करण्यात आला.
याचिकाकर्त्यांना तो वाचण्यासाठी देण्यात आला व पुढील तारखेवर त्यामधील सूचना सांगण्याचे न्यायालयाने सांगितले. 'लोकमत'ने मेळघाटातील रिक्त जागांचा मुद्दा वारंवार मांडला होता, हे विशेष.
मेळघाटातील आदिवासींना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना मेळघाटात प्रत्यक्ष पाहणीचे आदेश दिले होते. त्याचा अहवाल १८ डिसेंबर रोजी आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांनी न्यायालयात सादर केला. त्यामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. बालमृत्यूमध्ये वाढ झाल्याची कबुलीही दिली. धूळघाट रेल्वे, बैरागड, हतरू, कळमखार, साद्रावाडी या पाच आरोग्य केंद्रांमध्ये एका आठवड्याच्या आत बालरोगतज्ज्ञ व प्रसूतिरोगतज्ज्ञाची नियुक्ती करण्याचे निर्देश न्यायालयाने आरोग्य विभागाला दिले.
Web Summary : Bombay High Court orders immediate filling of pediatrician and gynecologist posts in Melghat's health centers within a week due to rising child mortality. The health department acknowledged the issue and submitted a report, promising to fill all vacancies. The court instructed a review of the report.
Web Summary : बढ़ती बाल मृत्यु दर के कारण बॉम्बे हाईकोर्ट ने मेलघाट के स्वास्थ्य केंद्रों में बाल रोग विशेषज्ञों और स्त्री रोग विशेषज्ञों के पद एक सप्ताह के भीतर भरने का आदेश दिया। स्वास्थ्य विभाग ने समस्या स्वीकार की और रिक्तियां भरने का वादा किया। कोर्ट ने रिपोर्ट की समीक्षा करने का निर्देश दिया।