आनंदराव अडसुळांना तत्काळ अटक करा
By Admin | Updated: December 30, 2016 00:43 IST2016-12-30T00:43:22+5:302016-12-30T00:43:22+5:30
अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी पदाचा दुरुपयोग करुन माझ्यावर झालेला अन्याय

आनंदराव अडसुळांना तत्काळ अटक करा
हल्ला प्रकरण : पुष्पा चौकीकरांची सीएमना मागणी
अमरावती : अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी पदाचा दुरुपयोग करुन माझ्यावर झालेला अन्याय दाबण्याचा प्रयत्न के ला. त्यांच्या विरुध्द अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदानव्हे गुन्हा नोंदविण्याचे आदेश द्या, अशी मागणी पुष्पा चौकीकर यांनी मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांना गुरुवारी केली.
शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी २६ डिसेंबर रोजी आमदार रवि राणा यांच्या कार्यालयावर हल्ला केला होता. हल्लेखोरांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार चौकीकर यांनी केली होती. त्यांच्या विरुध्द अॅट्रा़ॅसिटी आणि इतर कायद्यांतर्गत शिवसैैनिकांविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत. आरोपींना वाचविण्यासाठी खासदार असलेले आनंदराव अडसूळ त्यांच्या पदाचा गैरवापर करीत आहेत.