नकली सोने विकणाऱ्यांना अमरावतीत पकडले
By Admin | Updated: March 17, 2015 01:33 IST2015-03-17T01:33:06+5:302015-03-17T01:33:06+5:30
नकली सोने विकून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन परप्रातींय आरोपींना मालेगाव

नकली सोने विकणाऱ्यांना अमरावतीत पकडले
अमरावती : नकली सोने विकून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन परप्रातींय आरोपींना मालेगाव पोलिसांनी अमरावतीमधील राजुरा जंगलात पकडले. संदीप पवार(२५, बैतूल) व राजेंद्र पवार(३८,रा. उमठा, नागपूर) असे, अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पोलीस सुत्रानुसार नकली सोने विकणारी ही टोळी महाराष्ट्रभरात सक्रिंय असून यामध्ये आठ ते दहा आरोपीचा समावेश आहे. यामधील आरोपींनी मालेगाव येथील कॅम्प पोलीस ठाण्यांतर्गत एका व्यक्तीला कमी पैश्यात सोने देण्याची बतावणी करून ४ लाखांने लुबाडले आहे. या तक्रारीवरून तेथे आरोपींविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांनी ग्राहक बनून आरोपींशी सपर्क होता. त्याच्यांशी फोनवर सवांद साधून सोमवारी सोन्याचे सिक्के अमरावतीत देण्याचे आरोपींना सांगितले होते. या आधारे कॅम्प पोलीस ठाण्याचे जमादार खैरनार, पोलीस शिपाई गांगुर्डे, भामरे आणि वाघ अमरावतीत पोहचले. आरोपींनी त्यांना राजुरा येथील जंगलात बोलाविले होते. त्यामुळे फे्रजरपुरा पोलिसांच्या मदतीने कॅम्प पोलिसांनी सापळा रचला. सोमवारी फ्रेजरपुरा डिबी स्कॉडचे गजानन बरडे, अमोल मनोहरे, विजय राऊत, रोशन किरसान, नीलेश मेहरे, विजय बहादुरे यांनी राजुरा जगंलात सापळा रचला. दुपारी १ वाजताच्या सुमारास मोठ्या शीताफीने पोलिसांनी आरोपींना पकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामध्ये दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांनी यश मिळाले. दोन्ही आरोपींना कॅम्प पोलिसांनी सोबत नेले. या घटनेमुळे राजुरा जंगल भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पोलीस घटनास्थळी ताफ्यासह दाखल झाले असता परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
दोन किलो नकली सोन्याचे सिक्के जप्त
मालेगाव व फे्र जरपुरा पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याजवळील दोन किलो नकली सोन्याचे सिक्के जप्त केले. आरोपींना गुप्तधन मिळाले होते, ते नकली सिक्के असल्याने शांतीसाठी पूजापाठ केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. जप्त केलेले नकली सोने आरोपी २ लाख रुपयांमध्ये विकणार होते.