ऐतिहासिक परकोट कात टाकतोयं
By Admin | Updated: February 2, 2015 22:57 IST2015-02-02T22:57:35+5:302015-02-02T22:57:35+5:30
अमरावतीचा ऐतिहासिक वारसा असलेल्या परकोटाच्या दुरुस्तीला प्रारंभ झाला आहे. सुमारे २०९ वर्षापूर्वीचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून परकोटाच्या ढासळलेल्या

ऐतिहासिक परकोट कात टाकतोयं
अमरावती : अमरावतीचा ऐतिहासिक वारसा असलेल्या परकोटाच्या दुरुस्तीला प्रारंभ झाला आहे. सुमारे २०९ वर्षापूर्वीचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून परकोटाच्या ढासळलेल्या भिंतीना पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणात नवे रुप दिले जात आहे. त्याकरिता कोलकाता येथील कारागीर अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
केंद्र शासनाच्या अुनदानातून परकोटाचे सांैदर्यीकरण, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. नागपूर येथील विदर्भ पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीत परकोटाच्या दोन भिंतीना नवा लूक दिला जात आहे. त्यासाठी ८७ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पुरातत्व विभागाच्या पॅनलवर असलेले कोलकाता येथील कंत्राटदार अमीर अहेमद सिद्दीकी यांना परकोटाच्या सौदर्यीकरणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.