कन्हान रेतीची अवैध वाहतूक; तीन ट्रक पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST2021-07-28T04:13:18+5:302021-07-28T04:13:18+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई तिवसा : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कन्हान रेतीचीचे तीन ट्रक मंगळवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ...

कन्हान रेतीची अवैध वाहतूक; तीन ट्रक पकडले
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
तिवसा : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कन्हान रेतीचीचे तीन ट्रक मंगळवारी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचवटीजवळ ही कारवाई करण्यात आली.
नागपूरहून अमरावतीच्या दिशेने तिवसा हद्दीतून दररोज शेकडो कन्हान रेतीचे ट्रक धावतात. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने आता रेती चोरट्यांच्या मुसक्या आवरायला सुरुवात केली आहे. दोन ट्रकबाबत चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले, तर एका ट्रकमध्ये परवान्यापेक्षा जास्त रेती आढळून आल्याने महसूल अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. ट्रकचालक नईम सै. मोहम्मद (३३, रा. परतवाडा) व मो. शकील मो. शरीफ (रा. अमरावती) यांना ताब्यात घेण्यात आले. लकी अली (रा. परतवाडा) व इर्शाद कुरेशी (रा. अमरावती) हे दोन मालक पसार झाले. ट्रकसह ३४ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विजय गराड, कर्मचारी सुनील केवतकर, संतोष तेलंग, बळवंत दाभणे, मंगेश लकडे, श्रीकृष्ण मानकर यांनी केली.