जनावरांची अवैध वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:13 IST2021-03-07T04:13:26+5:302021-03-07T04:13:26+5:30

मोर्शी : अकोल्याकडे जनावरे घेऊन निघालेले चारचाकी वाहन गुन्हे शाखेने जप्त केले. मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावर ६ ...

Illegal transportation of animals | जनावरांची अवैध वाहतूक

जनावरांची अवैध वाहतूक

मोर्शी : अकोल्याकडे जनावरे घेऊन निघालेले चारचाकी वाहन गुन्हे शाखेने जप्त केले. मोर्शी ते चांदूर बाजार मार्गावर ६ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. दोन आरोपींना जनावरांची अवैध वाहतूकप्रकरणी ताब्यात घेण्यात आले.

मोहम्मद कासिम मोहम्मद सलीम (२४) व असेउद्दीन (२२, दोघेही रा. माना ता. मूर्तिजापूर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एमएच ३० बीडी २७५५ क्रमांकाचे वाहन, सहा गोवंश आणि दोन मोबाईल असा ४ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विजय लेव्हरकर, दीपक सोनाळेकर, अमित वानखडे, युवराज मानमोडे यांनी ही कारवाई केली.

Web Title: Illegal transportation of animals