रेतीची अवैध वाहतूक, टेम्पो पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST2021-04-06T04:12:48+5:302021-04-06T04:12:48+5:30
----------------------------------------------------------------- काठीने मारहाण, इसम जखमी अमरावती : राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील साईनगर चौकात क्षुल्लक कारणावरून एका इसमाच्या डोक्यावर काठीने मारहाण ...

रेतीची अवैध वाहतूक, टेम्पो पकडला
-----------------------------------------------------------------
काठीने मारहाण, इसम जखमी
अमरावती : राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील साईनगर चौकात क्षुल्लक कारणावरून एका इसमाच्या डोक्यावर काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना ३ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी रविवारी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. विष्णू नारायण हिंगे (४०, रा. अमरावती) असे आरोपीची नाव आहे. फिर्यादी अफरोज खान हमीद खान (४६, रा. गौसनगर) यांच्या तक्रारीवरून भादंविचे कलम ३२४ अन्वये गुन्हा नोंदविला.
---------------------------------------------
शिष्यवृत्ती अर्जाला १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
अमरावती : महाडीबीटी प्रणालीवरील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयांनी वर्ष २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्रवेशित व नूतणीकरणाचे अर्ज विद्यार्थ्यांकडून परिपूर्ण भरून घेऊन पोर्टलला सादर करावे, असे आवाहन सहायक समाजकल्याण उपायुक्त मंगला मून यांनी केले आहे.