मेळघाटात तेराव्या वित्त आयोगाच्या निधीत गैरप्रकार

By Admin | Updated: April 20, 2015 00:22 IST2015-04-20T00:22:15+5:302015-04-20T00:22:15+5:30

जी रेन्ज सोलर एनर्जी चांदूररेल्वे या कंपनीने एम.ई.डी.ए. (मेडा) कडून अधिकृत आर.सी. मान्यता न घेताच मेळघाटातील पन्नास ग्रामपंचायत सचिवांशी संगनमत करून..

Illegal thirteen thirteen finance commission funds | मेळघाटात तेराव्या वित्त आयोगाच्या निधीत गैरप्रकार

मेळघाटात तेराव्या वित्त आयोगाच्या निधीत गैरप्रकार

१० ग्राम सचिवांची वेतनवाढ रोखली : दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल होणार
राजेश मालवीय धारणी
जी रेन्ज सोलर एनर्जी चांदूररेल्वे या कंपनीने एम.ई.डी.ए. (मेडा) कडून अधिकृत आर.सी. मान्यता न घेताच मेळघाटातील पन्नास ग्रामपंचायत सचिवांशी संगनमत करून निकृष्ट व हलक्या दर्जाचे कमी सोलर लॅम्प लावून १३ वित्त आयोगाच्या निधीचा गैरव्यवहार केल्याचा तारांकित मुद्दा आमदार राजेंद्र पाटनी यांनी विधानसभेत मांडला.
धारणी पंचायत समितीच्या बीडीओंनी तडकाफडकी १० ग्राम सचिवांची दोन वार्षिक वेतनवाढ थांबवून ५ ग्रामसचिवांना सक्तीची ताकिद दिली व त्यांच्या सेवा पुस्तिकेत नोंद करून कंत्राटी २ ग्रामसचिवांची सेवा समाप्ती आणि २ ग्रामसचिवांचे निलंबन प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे पाठविल्याने पं.स. मध्ये एकच खळबळ उडाली आहे. गैरव्यवहाराची पूर्ण चौकशीअंती फौजदारी गुन्हे दाखल होण्याचे संकेत दिसत आहे.
शासनाकडून धारणी पंचायत समितीला प्राप्त झालेल्या १३ वित्त आयोगाच्या २ कोटी रुपये निधीवर तालुक्यातील २८ ग्रामपंचायत सचिवांनी १० टक्के कमीशनपोटी जी. रेन्ज सोलर या बोगस कंपनीकडून नियमबाह्यरीत्या सोलर लॅम्प खरेदी करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. खासदार आनंदराव अडसूळ यांनी विभागीय आयुक्तांकडे जी रेन्ज सोलर लॅम्प घोटाळ्याची तक्रार केली होती. आयुक्तांनी चौकशीचे आदेश आणि आमदार राजेंद्र पाटनी यांनी हा गंभीर मुद्दा विधानसभेत तारांकित केल्याने पंचायत समिती कार्यालय अडचणीत आले आहे.
याप्रकरणी पं. स. बीडीओ रामचंद्र जोशी यांनी १५ एप्रिल रोजी तडकाफडकी जिल्हा परिषद १९९३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकार वापरून ग्रामविकास अधिकारी व ग्रामसचिव यांनी १३ वित्त आयोग निधी, तंटामुक्त गाव समिती बक्षीस निधी तसेच सामान्य निधी अंतर्गत सोलर लँप खरेदीमध्ये अनियमितता केल्याबाबत जिल्हा परिषद शिस्त व अपील नियम १९६४ (३) अन्वये ग्रामसचिव ए. बी. भावे, वानखडे, एम. बी. गवळी, व्ही. आर. राऊत, ए. एस. खानंदे, ए. एस. साळुंके, एस. बी. पवार, एम. पी. भटकर, एच. एम. चौधरी इत्यादींची दोन वार्षिक वेतनवाढ थांबवून उर्वरित आर. एन. किटुकले, पठाण, एन. ए. पिसे, व्ही. आर. राठोड, आर. बी. भिलावेकर यांना सक्त ताकिद देऊन त्यांची तत्काळ सेवा पुस्तिकेत नोंद घेण्याचे आदेश दिल्याने येथे खळबळ उडाली आहे.
किशोर सानप, वाय. ए. जाधव यांचे निलंबन प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल भंडारी यांच्याकडे पाठविल्याने पंचायत समिती प्रकाशझोतात आली असून संपूर्ण चौकशीअंती सोलर कंपनीस दोषी सचिवांवर फौजदारी कारवाईचे संकेत दिसत आहे.

बीडीओंची जी.रेन्ज कंपनीला कारणे दाखवा नोटीस
ग्रामसचिवांशी संगनमत करून सोलर लॅम्प विक्री करणारे अतुल शिरभाते, गणेश शिरभाते यांना २० मार्च रोजी बी. डी. ओ. कारणे दाखवा नोटीस देऊन मेडाची अधिकृत आर. सी. मान्यता पत्र ग्रामपंचायतीला वितरित केलेले कंपनीचे अधिकृत देयके, व्हॅट, टीन, विक्री कर नंबर आणि शासनास भरणा केलेल्या २०१२ ते २०१४ मधील व्हॅट रक्कमेची चलान प्रतसह दहा प्रश्नांचे उत्तर लेखी २४ तासात सादर करण्याचे आदेश दिले. मात्र शिरभाते कंपनीने १ महिन्यापर्यंत कोणतेही लेखी उत्तर सादर न केल्याने बी. डी. ओ. नी विशेष पत्र पाठवून पंचायत समिती व ग्रामपंचायतीमध्ये सोलर विक्रीकरिता संपर्क करू नये, अशी सक्त ताकिद दिली आहे.

जी रेन्ज सोलर लँप खरेदीत प्राथमिक चौकशीत अनियमितता आढळून आल्याने १० ग्रामसेवकांची २ वार्षिक वेतनवाढ थांबवून ५ ग्रामसेवकांना सक्तीची ताकीद देऊन सेवा पुस्तिकेत नोंदीचे आदेश दिले आहे. कंत्राटी ग्रामसेवक व्ही. आर. राठोड, ए. आर. आडे यांची सेवा समाप्ती प्रस्ताव आणि वाय. ए. जाधव, किशोर सानप यांचे निलंबन प्रस्ताव जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारीकडे पाठविणार असून पूर्ण चौकशीअंती फौजदारी गुन्ह्याची परवानगी घेऊन कार्यवाही केल्या जाईल.
रामचंद्र जोशी
गटविकास अधिकारी, धारणी.

Web Title: Illegal thirteen thirteen finance commission funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.