काकादरी-वागडोह रस्त्यावर अवैध सागवान जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:01 IST2020-07-20T05:00:00+5:302020-07-20T05:01:04+5:30
रविवारी वनविभागाकडून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आरोपी सुरेश बंशी गाठे (४०, रा. गोंडवाघोली, ता. अचलपूर) यास मुद्देमालासह ताब्यात घेवून वन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली. यात ११ हजार ९३ रुपये किमतीच्या सागवान लाकडाच्या तीन चरपटा, १० हजार रुपये किमतीची एमएच ३१ डी ९६१२ क्रमांकाची दुचाकी आणि ८०० रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण २१ हजार ८९३ रुपयांचा मुद्देमाल वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी सरकार जमा केला आहे.

काकादरी-वागडोह रस्त्यावर अवैध सागवान जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : दहिगाव-अंजनगाव वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काकादरी-वागडोह रस्त्यावर सागवान चरपटांची दुचाकीवर अवैध वाहतूक करीत असलेल्या आरोपीला अटक केली. लाकडासह दुचाकी व मोबाईलही जप्त करण्यात आला.
रविवारी वनविभागाकडून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आरोपी सुरेश बंशी गाठे (४०, रा. गोंडवाघोली, ता. अचलपूर) यास मुद्देमालासह ताब्यात घेवून वन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली. यात ११ हजार ९३ रुपये किमतीच्या सागवान लाकडाच्या तीन चरपटा, १० हजार रुपये किमतीची एमएच ३१ डी ९६१२ क्रमांकाची दुचाकी आणि ८०० रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण २१ हजार ८९३ रुपयांचा मुद्देमाल वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी सरकार जमा केला आहे. ही कारवाई सहायक वनसंरक्षक अशोक पºहाड, वनपरिक्षेत्र अधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांच्या मार्गदर्शनात वनपाल बी.पी. गायकवाड, एस.एस. बिरोळे, पी.एन. जैन आणि वनरक्षक व्ही.बी. चव्हाण, ए.ए. अंधारे, वनमजूर भैयालाल जामकर, चालक चांदूरकर यांनी केली. यापूर्वी अकोट वन्यजीव विभागाच्या राखीव वनातून सागवान चोरटे जेरबंद करण्यात आले होते. अकोट येथे घरी धाडसत्र राबवून सागवान लाकूड मोठ्या प्रमाणात जप्त केले होते.