अवैध कत्तलखाना उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:12 IST2021-05-24T04:12:10+5:302021-05-24T04:12:10+5:30

दर्यापूर : येथील कासदपुरा या ठिकाणी गोवंशाची अवैधरित्या कत्तल होत असल्याची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी रविवारी सकाळी ...

Illegal slaughterhouse demolished | अवैध कत्तलखाना उद्ध्वस्त

अवैध कत्तलखाना उद्ध्वस्त

दर्यापूर : येथील कासदपुरा या ठिकाणी गोवंशाची अवैधरित्या कत्तल होत असल्याची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी रविवारी सकाळी ६.३० वाजता धाड टाकून कारवाई केली. शेख युनूस शेख घुडन (६६) याच्या घरून १६५ किलो गोमांस व कटाईचे साहित्य असे ३४ हजार २०० रुपयांचा माल जप्त करून गुन्हा नोंदविला. तेथून शेख युनूससह रहिम खान (३२) यालादेखील अटक करण्यात आली.

ठाणेदार प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रविकिरण खंदारे, नापोकाँ. प्रशांत ढोके, बजरंग इंगळे, नितीन पाटील ,दिलीप घोडे, रमेश भुजाडे, रवी तायडे, सिध्दार्थ आठवले, पोलीस शिपाई सागर नाठे, शरद सारसे, विशाल कलाने, वंदना वेलकर, अर्चना सपकाळ, सविता पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Illegal slaughterhouse demolished