सागवान वृक्षांची अवैध कत्तल, दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 23:02 IST2018-11-19T23:01:57+5:302018-11-19T23:02:32+5:30
पूर्व मेळघाट वनविभागाच्या घटांग वनपरिक्षेत्रांतर्गत बिहाली वनवर्तुळात कार्यरत महिला वनरक्षकाला वनतस्कर व त्यांच्या समर्थकांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी बिहालीच्या वनरक्षक कविता भोरे कर्तव्यावर असताना अज्ञात इसमांनी तीन मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग केला. यात तिला धमकावण्याचाही प्रयत्न केला.

सागवान वृक्षांची अवैध कत्तल, दगडफेक
अनिल कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : पूर्व मेळघाट वनविभागाच्या घटांग वनपरिक्षेत्रांतर्गत बिहाली वनवर्तुळात कार्यरत महिला वनरक्षकाला वनतस्कर व त्यांच्या समर्थकांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
सोमवारी बिहालीच्या वनरक्षक कविता भोरे कर्तव्यावर असताना अज्ञात इसमांनी तीन मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग केला. यात तिला धमकावण्याचाही प्रयत्न केला.
जिवाच्या आकांताने भयभित होऊन तेवढ्याच वेगाने आपले वाहन चालवित परतवाडास्थित लॉगींग युनिटमधील सहायक उपवनसंरक्षकांच्या कार्यालयात घाबरलेल्या स्थितीत त्या दाखल झाल्यात. उपस्थित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना व वन कर्मचाºयांना त्यांची आपबिती सांगितली. यावर वन अधिकाºयांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिलेत. बिहाली वर्तुळात वनरक्षक कविता भोरे गावकºयांसमवेत अवैध वृक्षतोड होत असलेल्या घटनास्थळावर जेव्हा दाखल झाल्या, तेव्हा आरोपींनी त्यांच्यावर दगडफेक केली होती. त्यांच्यावर कुºहाडही भिरकावली होती. ही कुºहाड जप्त करून त्यांनी आरोपींची माहिती मिळविली होती. दगडफेक व कुºहाडीचा सामना केल्यानंतर त्यांना या प्रकाराला सामोरे जावे लागले. बिहाली वर्तुळाच्या वनरक्षक कविता भोरे यांनी २७ आॅक्टोबरला सागवान वृक्षांची अवैध वृक्षतोड करणाºयांना घटनास्थळावरून पिटाळून लावले होते. घटनास्थळावरून त्यांनी २ लाख १७ हजारांचा माल जप्त केला. घटनास्थळाचा व मालाचा आणि थुटांचा पंचनामा करून प्रथम वन गुन्ह्याची आपल्या दफ्तरी नोंद केली. पीओआर फाडून आरोपींची माहिती वरिष्ठ वन अधिकाºयांना दिली. यात कोहाना येथील तीन आदिवासींना ताब्यात घेवून जुळ्या नगरीत व ब्राम्हणवाडा थडीत संबंधितांवर धाडीही टाकल्यात.
आरोपींची माहिती मागवली
वन तस्करीत गुंतलेल्या आरोपींची माहिती पोलीस विभागाकडून वनाधिकाºयांनी मागवली आहे. तसे पत्र एसडीपीओंना वन अधिकाºयांकडून पाठविण्यात आले आहे. संबंधित वन तस्करांवर यापूर्वी केल्या गेलेल्या कारवाईची माहिती परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयाकडूनही चौकशी अधिकाऱ्यांनी मागवली आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे वाढणार
बिहाली वन नाक्यावर तीन नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. यापूर्वी एकच सीसीटीव्ही कॅमेरा होता. तोही नादुरूस्त. नाक्यावरून जाणाºया वाहनांची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे निर्देश वनाधिकाºयांनी दिले आहेत.
नाक्यावरील महिला वनरक्षकांना बदलवून त्या जागी पुरूष वनरक्षक देण्याचा वरिष्ठ वनाधिकारी विचार करीत आहेत. यात पूर्व मेळघाट वन विभागांतर्गत वनरक्षकांची अनेक पद रिक्त आहेत. या रिक्त पदांची अडचण महिला वनरक्षक बदलविताना येत आहे.