अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:12 IST2021-03-28T04:12:38+5:302021-03-28T04:12:38+5:30
तळेगाव दशासर : स्थानिक पोलिसांनी शुक्रवारी तळेगाव-घुईखेड सुपर एक्स्प्रेस हायवेवर नाकाबंदी करीत अवैध रेतीने भरलेला ट्रक ताब्यात घेऊन ...

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रक पोलिसांच्या ताब्यात
तळेगाव दशासर : स्थानिक पोलिसांनी शुक्रवारी तळेगाव-घुईखेड सुपर एक्स्प्रेस हायवेवर नाकाबंदी करीत अवैध रेतीने भरलेला ट्रक ताब्यात घेऊन दोघांना अटक केली.
यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथून ट्रकमधून रेतीची चोरी होत असल्याची माहिती मिळाली असता, तळेगाव पोलिसांनी लगेच घुईखेड गावाजवळ शुक्रवारी सकाळी ११:३० च्या सुमारास नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी केली. एमएच ३६ एफ ०४६४ क्रमांकाच्या ट्रकमध्ये चार ब्रास रेती विनारॉयल्टी आढळून आली. पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीची रेती व ट्रकसह ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी बाभूळगाव येथील लहुजी भांडे (६०) व वसीम मुस्तफा पठाण (२७) यांना ताब्यात घेतले. ही कारवाई ठाणेदार अजय आखरे यांच्या मार्गदर्शनात संजय भोपळे, राजू डगवार, बंडू मेश्राम, होमगार्ड विलास खडसे यांनी केली.