तिवसा हद्दीतून अवैध रेती जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:10 IST2021-06-26T04:10:33+5:302021-06-26T04:10:33+5:30

अल्पवयीन मुलीला नेले पळवून तिवसा : शहरातील १७ वर्षीय मुलगी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. तिला अज्ञात व्यक्तीने ...

Illegal sand confiscated from Tivasa border | तिवसा हद्दीतून अवैध रेती जप्त

तिवसा हद्दीतून अवैध रेती जप्त

अल्पवयीन मुलीला नेले पळवून

तिवसा : शहरातील १७ वर्षीय मुलगी कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिवसा पोलीस ठाण्यात २३ जून रोजी करण्यात आली. पोलिसांनी भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

---------------------

धोतरखेडा येथे विवाहितेचा छळ

अंजनगाव सुर्जी : अचलपूर तालुक्यातील धोतरखेडा येथे ३१ वर्षीय विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांत अभिजित देवनाथ लोळे, देवनाथ वासुदेव लोळे, अक्षय देवनाथ लोळे (सर्व रा. धोतरखेड) व दोन महिलांविरुद्ध भादंविचे कलम ४९८ (अ), ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

---------------

मजुरीऐवजी मिळाले बांबूचे फटके

अंजनगाव सुर्जी : शहरातील बालाजी प्लॉट येथे कामाचे पैसे मागण्याकरिता गेलेल्या दोघांना बांबूने डोक्यावर मारून जखमी करण्यात आले. याप्रकरणी प्रमोद गोपाळराव चांदूरकर (४१) यांनी अतुल कुरेकर याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: Illegal sand confiscated from Tivasa border