शिंगोरी येथे अवैध दारूविक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:14 IST2021-02-13T04:14:10+5:302021-02-13T04:14:10+5:30
पान ३ साठी तिघांना अटक, कारसह २ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त वरूड : तालुक्यातील शिंगोरी येथील एका घरातून ...

शिंगोरी येथे अवैध दारूविक्री
पान ३ साठी
तिघांना अटक, कारसह २ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त
वरूड : तालुक्यातील शिंगोरी येथील एका घरातून देशी दारूच्या २४ पेट्या, ७० बॉटल, एक व्हॅन, दोन मोबाईलसह एकूण २ लाख ६९ हजार २५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ११ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० च्या सुमारास बेनोडा पोलिसांनी ही कारवाई केली. प्रमोद रामकृष्ण श्रीराव (५२), प्रकाश रामदास कुरवाडे (२०) व एक महिला (सर्व रा.शिंगोरी) अशी आरोपींची नावे आहेत.
श्रीराव आणि कुरवाडे याच्या घरी अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती ठाणेदार मिलिंद सरकटे यांना मिळाली. यावरून उपनिरीक्षक पप्पुलवार, जमादार अशोक वाकेकर, दिवाकर वाघमारे, कर्मचारी दिनेश राऊत, अन्केश वानखडे, नीलेश भुयार, महिला पोलीस उत्तरा पांडे, रीना तंतरपाळे यांच्या पथकाने धाडसत्र राबविले. शुक्रवारी पहाटे ४ वाजतापर्यंत ही कारवाई चालली. तिनही आरोपींना अटक करण्यात आली.