चिंचफैल येथे अवैध दारूविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:16 IST2021-06-16T04:16:21+5:302021-06-16T04:16:21+5:30

------------------------------------------------------------------------ अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचफैल येथे अरुण पतंगराव लिंगप्पा (५०) हा अवैद दारूविक्री करीत असल्याची माहिती ...

Illegal sale of liquor at Chinchphal | चिंचफैल येथे अवैध दारूविक्री

चिंचफैल येथे अवैध दारूविक्री

------------------------------------------------------------------------

अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचफैल येथे अरुण पतंगराव लिंगप्पा (५०) हा अवैद दारूविक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी कारवाई करून त्याच्याकडून देशी दारूच्या २४ बॉटल जप्त केल्या. १४ जून रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. ----------------

गोवंशाची अवैध वाहतूक करणारे वाहन पोलिसांच्या ताब्यात

तळेगाव दशासर : स्थानिक पोलिसांनी मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास तळेगाव ते निमगव्हाण फाट्यावर नाकाबंदी करून चार गोऱ्हे जप्त करण्यात आले. एमएच २७ एक्स ८५१७ क्रमांकाच्या वाहनात ही जनावरे कोंबण्यात आली होती. एकूण ३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करून वाहनचालक ऋषभ मारुती कोळेकर (२६, रा. पांझरा, ता. नांदगाव खंडेश्वर), जनावर मालक सय्यद सादिक सय्यद अयूब (४५, रा. सालोड, ता. नांदगाव खंडेश्वर) यांना अटक करण्यात आले. ठाणेदार अजय आखरे यांच्या मार्गदर्शनात जमादार संजय भोपळे, मनीष कांबळे, संदेश चव्हाण, प्रदीप मस्के यांनी कारवाई केली.

Web Title: Illegal sale of liquor at Chinchphal