अवैध दारू विक्री, महिलेविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:15 IST2021-06-09T04:15:31+5:302021-06-09T04:15:31+5:30

अमरावती :अवैध दारू विक्री करणाऱ्या महिलेच्या घरी गाडगेनगर पोलिसांनी रविवारी धाड टाकली. दरम्यान दारू विक्रेता महिलेने पोलिसांशी हुज्जतबाजी करून ...

Illegal sale of alcohol, crime against women | अवैध दारू विक्री, महिलेविरुद्ध गुन्हा

अवैध दारू विक्री, महिलेविरुद्ध गुन्हा

अमरावती :अवैध दारू विक्री करणाऱ्या महिलेच्या घरी गाडगेनगर पोलिसांनी रविवारी धाड टाकली. दरम्यान दारू विक्रेता महिलेने पोलिसांशी हुज्जतबाजी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणात पोलिसांनी कविता राजरतन डोंगरे (२८ रा. लक्ष्मीनगर) हिला अटक केली असून, तिच्या घरातून ४,३२० रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे.

-------------------------------------------------------

सतीधाम मार्केटमधून दुचाकी लंपास

अमरावती : सतीधाम मार्केटमधून तरुणाची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना रविवारी उघडकीस आली. अभिषेक नरेंद्र महर्षी (२५ रा. सतीधाम मार्केट, हिन्दुस्थान हॉटेलजवळ) याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंदविला.

00000000000000000000000

शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी

अमरावती : शिवीगाळ करून एका इसमाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना रविवारी भातकुली ठाण्याच्या हद्दीतील जसापुरात घडली. महिलेच्या तक्रारीवरून भातकुली पोलिसांनी आरोपी बाबुलाल वानखडे (४१ रा. जसापूर) विरुध्द गुन्हा नोंदविला. घटनेचा प्राथमिक तपास एएसआय मधुकर नोकार यांनी केला.

Web Title: Illegal sale of alcohol, crime against women