तिवसा येथे अवैध देशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST2021-02-05T05:33:58+5:302021-02-05T05:33:58+5:30

लाखाचा मुद्देमाल, प्रजासत्ताक दिनी तिवसा पोलिसांची कारवाईतिवसा : प्रजासत्ताक दिनी सकाळी १० वाजता शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात अवैध देशी ...

Illegal native liquor seized at Tivasa | तिवसा येथे अवैध देशी दारू जप्त

तिवसा येथे अवैध देशी दारू जप्त

लाखाचा मुद्देमाल, प्रजासत्ताक दिनी तिवसा पोलिसांची कारवाईतिवसा : प्रजासत्ताक दिनी सकाळी १० वाजता शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात अवैध देशी दारूच्या गोपनीय माहितीवरून वर तिवसा पोलिसांनी धाड टाकून दारूच्या ११ पेट्या व चारचाकी (एमएच २९ एन ६१५) सह १ लाख १ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रदीप ढोबळे (३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने वाहनात देशी दारूच्या पेट्या आणल्याची माहिती तिवसा पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस निरीक्षक रीता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के, कॉन्स्टेबल अरविंद गावंडे, रोहित मिश्रा, रोशन नंदरधने, राजेंद्र चव्हाण, नरसिंग राठोड यांनी ३१,७४० रुपये किमतीची दारू व चारचाकी वाहन ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

-----------------

Web Title: Illegal native liquor seized at Tivasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.