अवैध गौण खनिज उत्खनन, बडनेरात ४ वाहनांवर कारवाई

By Admin | Updated: December 10, 2015 00:31 IST2015-12-10T00:31:44+5:302015-12-10T00:31:44+5:30

बडनेऱ्यात शासकीय जागेतील अवैधरित्या गौण खनिजाची चोरी करणाऱ्या चार वाहनांविरुद्ध महसूल विभागाने तहसीलदार बगळे .....

Illegal mineral exploration, action on 4 vehicles in Badnera | अवैध गौण खनिज उत्खनन, बडनेरात ४ वाहनांवर कारवाई

अवैध गौण खनिज उत्खनन, बडनेरात ४ वाहनांवर कारवाई

वाहने जप्त : ६० हजाराचा दंड
बडनेरा : बडनेऱ्यात शासकीय जागेतील अवैधरित्या गौण खनिजाची चोरी करणाऱ्या चार वाहनांविरुद्ध महसूल विभागाने तहसीलदार बगळे यांच्या आदेशावरुन कारवाई केली. यात ६० हजाराचा दंड आकारण्यात आला असून सर्व वाहनांना पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. ही कारवाई ९ डिसेंबर रोजी करण्यात आली.
बडनेऱ्यात शासकीय जागेत मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची चोरी होत आहे. कोंडेश्वर, अंजनगावबारी मार्ग तसेच इतरही भागात मोठ्या प्रमाणात राजरोसपणे गौण खनिजाची चोरी होत आहे. तहसीलदार सुरेश बगळे यांच्या आदेशावरुन बडनेऱ्यात महसूल विभागाने ९ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता कारवाईचा बडगा उभारुन यात चार वाहनांना गौण खनिज घेवून जात असतांना ताब्यात घेतले. अवैधरित्या गौण खनिज घेवून जाणाऱ्या एम२७-सी-६४५०, एमएच२७-एक्स-५६७१, एमएच२७-ओ-२४८७ व एमएच २८-डी-२००५ या वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या सर्व वाहनांना बडनेरा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. वाहन मालक रमेश भोयर, सूर्यभान पंचारे, दिगांबर ढोके, निलेश नकाशे यांना एकूण ६० हजाराचा दंड आकारण्यात आला आहे. कारवाईत महसूल विभागाचे मंडळ अधिकारी गोरडे, तलाठी एस.आर. भगत, एन. ए. पांडे, वानखडेसह इतरही कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

Web Title: Illegal mineral exploration, action on 4 vehicles in Badnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.