अचलपुरात रस्त्यावर थाटली अवैध मांसविक्रीची दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:16 IST2021-09-07T04:16:28+5:302021-09-07T04:16:28+5:30

अचलपूर : शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी अवैध मांसविक्रीची खुली दुकाने थाटली आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने विनापरवानगी दुकाने आहेत. ...

Illegal meat shops on the streets of Achalpur | अचलपुरात रस्त्यावर थाटली अवैध मांसविक्रीची दुकाने

अचलपुरात रस्त्यावर थाटली अवैध मांसविक्रीची दुकाने

अचलपूर : शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी अवैध मांसविक्रीची खुली दुकाने थाटली आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने विनापरवानगी दुकाने आहेत. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांसह आजूबाजूने ये-जा करणाऱ्या नागरिकांना सहन करावी लागत आहे. अचलपूर नगर परिषद प्रशासनाने या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केलेली नाही.

अचलपूर शहर हे अतिसंवेदनशील शहर आहे. बिलनपुरा येथील झेंडा चौक, काळा हनुमान मंदिर रस्त्यावरील जोगीपुरा तसेच अचलपूर-अमरावती मुख्य मार्गावरील चांदूर नाका या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विनापरवाना खुल्या स्वरूपात अवैध मांसविक्रीची दुकाने थाटली आहेत. या दुकानांभोवती मांसाचे तुकडे पाहावयास मिळतात. कमालीची घाण व कुत्र्यांचा वावरही या परिसरात वाढला आहे. या भागाने ये-जा करणाऱ्या लहान मुलांना ही कुत्री चावा घेण्याचा प्रयत्न करतात. याबाबत नगरसेवकांनी नगर परिषद प्रशासनाला तक्रार देऊनसुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाही, असा नागरिकांचा रोष आहे.

Web Title: Illegal meat shops on the streets of Achalpur