टाकरखेडा येथे अवैध दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST2021-02-05T05:26:47+5:302021-02-05T05:26:47+5:30

अमरावती : वलगाव पोलिसांनी येथील टाकरखेडा संभू येथे कारवाई करून १०४० रुपयांची अवैध दारू शनिवारी जप्त केली. आरोपी ...

Illegal liquor seized at Takarkheda | टाकरखेडा येथे अवैध दारू पकडली

टाकरखेडा येथे अवैध दारू पकडली

अमरावती : वलगाव पोलिसांनी येथील टाकरखेडा संभू येथे कारवाई करून १०४० रुपयांची अवैध दारू शनिवारी जप्त केली. आरोपी सुधाकर प्रभाकर फाटे(४५, रा. टाकरखेडा संभू) याच्याविरुद्ध गुन्ह नोंदविला. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी ती दारू जप्त केली.

----------------------------------------------------------------

चिचफैल येथे दारू पकडली

अमरावती : राजापेठ पोलिसांनी चिचफैल येथून १२,५०० रुपयांची अवैध दारू शनिवारी जप्त केली. आरोपी योगेश किसनराव टेकाम (२५, रा. चिचफैल) विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

----------------------------------------------------------

माताखिडकीजवळून अवैध दारू जप्त

अमरावती : खोलापुरीगेट पोलसांनी शितला माता मंदिर माताखिडकीजवळ कारवाई करून ९३६ रुपयांची अवैध दारू जप्त केली आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. आरोपी रामु हिरामण वाघमारे (५१, रा. माताखिडकी) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------------------------------------

बडनेरा पोलिसांची दाभा येथे धाड

अमरावती : बडनेरा पोलिसांनी दाभा येथे धाड टाकून आरोपीच्या ताब्यातून जुगार साहित्यासह १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. आरोपी धर्मदास कालीदास धामळे (३८, रा. दाभा. ता. नांदगाव खंडेश्वर ) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

----------------------------------------------------

सिद्धार्थनगरात जुगार पकडला

अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी येथील सिद्धार्थनगरात शनिवारी जुगारावर धाड टाकून १०४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केली. याप्रकरणी आरोपी रामनाथ कन्हैयालाल वाघमारे (४२, रा. सिद्धार्थ नगर), दिवाकर केनिराम भैसारे (५५, रा. नवसारी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: Illegal liquor seized at Takarkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.