रतनगंज नागोबा परिसरात अवैध दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:24 IST2021-02-28T04:24:46+5:302021-02-28T04:24:46+5:30
अमरावती : नागपुरीगेट पोलिसानी रतनगंज नगोबा परिसरात अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करून १०४० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई ...

रतनगंज नागोबा परिसरात अवैध दारू जप्त
अमरावती : नागपुरीगेट पोलिसानी रतनगंज नगोबा परिसरात अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करून १०४० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एका महिला आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------------------------------------------------
साई योगी रेस्टॉरेंट येथे दारू पकडली
अमरावती: भातकुली पोलिसांनी येथील साई योगी रेस्टॉरेंट येथे कारवाई करून ७४४० रुपयांची अवैध दारू शुक्रवारी जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी संदीप भानुदास नाकड (४०, रा. पायटांगी, ता. मूर्तिजापूर), बाळासाहेब तळोकार (रा. अमरावती) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------------------------------------------
संशयित आरोपी अटकेत
अमरावती : वाहनाच्या बॅटरी चोरण्यासाठी लपवून बसलेल्या संशयित आरोपीला शहर कोतवाली पोलिसांनी वालकट कंपाऊंडजवळील एका हॉस्पिटलजवळून ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. शेख शाहबाज शेख सलीम (२०, रा. अन्सारनगर) असे आरोपीचे नाव आहे.
------------------------------------------
ऑटोरिक्षाचा वाहतुकीस अडथळा
बडनेरा : रस्त्यावर ऑटोरिक्षा उभी वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शुक्रवारी रेल्वे स्थानक परिसरात कारवाई करण्यात आली. आरोपी विश्वास विठ्ठल झंझाड (५०, रा. नवी वस्ती, बडनेरा) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
----------------------------------------
चांदणी चौकात दारू जप्त
बडनेरा : पोलिसानी येथील चांदणी चौकात कारवाई करून ६३० रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. आरोपी शेख इमरान शेख नासीर (२८, रा. मोमीनपुरा बडनेरा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------------------------------------------