राजापेठ हद्दीत अवैध दारु पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:10 IST2021-06-01T04:10:54+5:302021-06-01T04:10:54+5:30
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना बायपास मार्गावर पोलिसांनी कारवाई करून ३० हजारांची अवैध दारू रविवारी जप्त केली. ...

राजापेठ हद्दीत अवैध दारु पकडली
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना बायपास मार्गावर पोलिसांनी कारवाई करून ३० हजारांची अवैध दारू रविवारी जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी अमोल बाबाराव मुंदे (३१, रा. आदर्शनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. सदर आरोपी दुचाकीने दारूविक्री करीत असल्याचे पोलिसांना आढळून आले.
---------------------------------------------------------
महाजनपुऱ्यात दारू पकडली
अमरावती : खोलापुरीगेट पोलिसांनी महाजनपुऱ्यात कारवाई करून १२४८ रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई रविवारी करण्यात आली. याप्रकरणी आरोपी शेषराव वसंतराव खंडेराव (४०, रा. महाजनपुरा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
----------------------------------------------------------
रतनगंज परिसरात दारू जप्त
अमरावती : नागपुरीगेट पोलिसांनी येथील रतनगंज परिसरात कारवाई करून ७८० रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई रविवारी करण्यात आली. याप्रकरणी सागर नरेश डोनारकर (२५, रा. रतनगंज) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.