जेवडनगरात अवैध दारू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:12 IST2021-05-22T04:12:44+5:302021-05-22T04:12:44+5:30

अमरावती : राजापेठ पोलिसांनी जेवडनगरात कारवाई करून ८२५ रुपयांची अवैध दारू २० मे रोजी जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ...

Illegal liquor seized in Jewadnagar | जेवडनगरात अवैध दारू पकडली

जेवडनगरात अवैध दारू पकडली

अमरावती : राजापेठ पोलिसांनी जेवडनगरात कारवाई करून ८२५ रुपयांची अवैध दारू २० मे रोजी जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विक्की सुभाष कांबळे (२०, रा. जेवडनगर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------------------------------------------

चवरेनगरातून दारू जप्त

अमरावती : राजापेठ पोलिसांनी गुरुवारी चवरेनगरात कारवाई करून ७७५ रुपयांची अवैध दारू जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रदीप ऊर्फ बाबूलाल कुरवाने (४०, रा. चवरेनगर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------------------------------------------------

कमेला ग्रऊंड येथे जुगार पकडला

अमरावती : नागपुरीगेट पोलिसांनी गुरुवारी कमेला ग्रऊंड येथे कारवाई करून जुगाराच्या साहित्य व रोख रक्कम असा एकूण ९ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी अनंत किसनराव साठे (५५, रा. सुकळी), मो. सलीम मो. हनीब (५०, रा. हैदरपुरा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध नागपुरीगेट पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

Web Title: Illegal liquor seized in Jewadnagar