हरताळा येथे अवैध दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:12 IST2021-01-15T04:12:16+5:302021-01-15T04:12:16+5:30
------------------------------------------------------ सायत येथे अवैध दारू जप्त अमरावती : भातकुली पोलिसांनी बुधवारी सायत येथून ७२० रुपयांची अवैध दारू जप्त केली. ...

हरताळा येथे अवैध दारू जप्त
------------------------------------------------------
सायत येथे अवैध दारू जप्त
अमरावती : भातकुली पोलिसांनी बुधवारी सायत येथून ७२० रुपयांची अवैध दारू जप्त केली. आरोपी भीमराव उकंडराव वर्धे (६०, रा. सायत ता. भातकुली) विरुद्ध गुन्हा नोंदविला. सदर आरोपी दारू विक्री करतान आढळून आला.
------------------------------------------------------
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
अमरावती : भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नांदगावपेठ येथील शिक्षक कॉलनीत बुधवारी घडली. रोशन मधुकरराव काकड (२८, रा. शिक्षक कॉलनी नांदगावपेठ, मूळ गाव एकलारा ता. अंजनगाव सुर्जी) असे मृताचे नाव आहे. आत्महत्यचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणी नांदगावपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
------------------------------------------------------
अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जखमी
अमरावती: दुचाकीस्वार युवकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी झाल्याची घटना १ जानेवारी रोजी पोद्दार शाळेसमोर घडली होती. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसानी बुधवारी गुन्हा नोंदविला आहे.
उत्तम गोवर्धन असे जखमीचे नाव आहे. जखमीचा भाऊ फिर्यादी दिलीप सहदेवराव गोवर्धन (४८, रा. कल्याण नगर) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
------------------------------------------------------------------
कैफ क्लेक्शनमध्ये चोरी
अमरावती: सिटी कोतवाली ठाणे हद्दीतील तखतमल इस्टेटस्थीत कैफ कलेक्शनमध्ये एक अज्ञात महिलेने १२ हजार ८४५ रूपयांच्या कपड्यांची चोरी झाली. ही घटना येथील सीसीटिव्ही कॅमेर्यांमध्ळे कैद झाली आहे. ही घटना बुधवारी उघडकीस आली.
या प्रकरणी फिर्यादी मोहम्मद फिरोज मोहम्मद इलीयाज कच्ची ( रा. जमील कॉलनी) यांनी पोलिसात तक्रार नोंदविली आहे.
-----------------------------------------------------------