पुसला परिसरात अवैध दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:12 IST2021-04-10T04:12:39+5:302021-04-10T04:12:39+5:30
पुसला : कोरोना लॉकडाऊन असताना येथे अवैध दारूची विक्री बिनबोभाटपणे सुरू आहे. परिणामी, गावात मद्यपीची संख्या वाढली आहे. ...

पुसला परिसरात अवैध दारू
पुसला : कोरोना लॉकडाऊन असताना येथे अवैध दारूची विक्री बिनबोभाटपणे सुरू आहे. परिणामी, गावात मद्यपीची संख्या वाढली आहे. सध्या कोरोनाचा फैलाव वाढला असताना देखील गावात सर्रास दारू विकली जात आहे. बाहेरून आलेले दारू पिऊन गावात वावरतात व धुमाकूळ घालताना दिसत आहे. नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
पुसला हे वरूड तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव असून मध्यप्रदेशाच्या सिमेवर आहे. या गावाला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. अलीकडेच या गावात अवैध दारूचा महापूर आला असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. दारूने गावातील युवा पिढी वाईट मार्गाला लागली आहे. गावात दारूचा अतिरेक झाला असून, बाहेर गावातील मद्यपी येथे दारू पिण्याकरिता येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यावर गर्दी वाढल्याचे दिसत आहे.