अवैध देशी दारूविक्रेते पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST2021-03-04T04:22:09+5:302021-03-04T04:22:09+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चांदूर बाजार : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तालुक्यातील तुळजापूर गढी या ठिकाणी नाकाबंदी ...

Illegal liquor dealers in police custody | अवैध देशी दारूविक्रेते पोलिसांच्या ताब्यात

अवैध देशी दारूविक्रेते पोलिसांच्या ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चांदूर बाजार : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तालुक्यातील तुळजापूर गढी या ठिकाणी नाकाबंदी करून अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले. १ मार्च रोजी पहाटे ही कारवाई करण्यात आली.

चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी दारूची विक्रीकरिता अवैध वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला मिळाली. त्यावरून नाकाबंदी करून झडती घेण्यात आली. यात आरोपी नितीन बोराडे (३२, रा. यावली शहीद) व प्रकाश रूपनारायण (५४, रा. तुळजापूर गढी) यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी आरोपींकडून १८ हजार ७२० रुपये किमतीची देशी दारू व १ लाख रुपये किमतीची चारचाकी असा एकूण १ लाख १८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन., अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, नायक पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद खर्चे व नीलेश डांगोरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण अंबाडकर व अमोल केंद्रे , चालक गोवर्धन नाईक यांनी केली.

Web Title: Illegal liquor dealers in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.