अवैध दारूविक्रेता ठार

By Admin | Updated: May 1, 2017 00:04 IST2017-05-01T00:04:45+5:302017-05-01T00:04:45+5:30

दारुची अवैध वाहतूक करणाऱ्यांची भरधाव दुचाकी ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.

Illegal liquor barons killed | अवैध दारूविक्रेता ठार

अवैध दारूविक्रेता ठार

बेलोरा टी-पॉईन्टवरील घटना : दुचाकी ट्रकवर धडकली
अमरावती : दारुची अवैध वाहतूक करणाऱ्यांची भरधाव दुचाकी ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलोरा टी-पॉईन्टवर घडली. अपघातात संदीप वासुदेव मोहने (३५) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून संतोष नारायण डाकोरे (३२, दोन्ही रा. दसरा मैदान) गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शालिग्राम गवई व पोलीस शिपाई प्रेमानंद गाडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता पोलिसांना घटनास्थळी दारूच्या १० ते १२ बाटल्या आढळून आल्या. संतोष डाकोेरे व त्याचा मित्र दुचाकी क्रमांक एम.एच.२७-ए.व्ही.-५३८३ ने अमरावतीवरून वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील हिंगणवाडी येथे मुलाला घेण्यासाठी जात होते.

एक जण गंभीर
अमरावती : दुपारी ते बडनेरामार्गे कारंजा लाडकडे भरधाव जात असताना बेलोरा टी-पॉईन्टवर त्यांची दुचाकी विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर धडकली. या अपघातात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला. काही नागरिकांनी दोघांनाही १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. पुढील तपास लोणी पोलीस करीत आहेत. संदीपच्या दुचाकीवर दारूच्या बाटल्यांचा बॉक्स होता. अपघातामुळे बाटल्या फुटून रस्त्यावर सर्वत्र विखुरल्या होत्या. उपरोक्त दोघेही अवैध दारुविक्रीच्या उद्देशाने जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा दारूविक्रीचा बळी असल्यचाची चर्चा होती.

Web Title: Illegal liquor barons killed