मुरुमाचे अवैध उत्खनन; ट्रॅक्टर, जेसीबी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:11 IST2021-04-18T04:11:57+5:302021-04-18T04:11:57+5:30

लेहगाव : शिरखेड पोलिसांनी अवैधरीत्या मुरुमाचे उत्खणन करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करीत चार ट्रॅक्टर व उत्खननाकरिता वापरलेला जेसीबी जप्त केला. ...

Illegal excavation of pimples; Tractor, JCB seized | मुरुमाचे अवैध उत्खनन; ट्रॅक्टर, जेसीबी जप्त

मुरुमाचे अवैध उत्खनन; ट्रॅक्टर, जेसीबी जप्त

लेहगाव : शिरखेड पोलिसांनी अवैधरीत्या मुरुमाचे उत्खणन करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करीत चार ट्रॅक्टर व उत्खननाकरिता वापरलेला जेसीबी जप्त केला. गोराळा गावालगतच्या शिवारामध्ये ११ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली.

चेतन टोपले (२८, रा. गोराळा) व प्रभुलाल गुर्जर (४०, रा. सावरखेड) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विनापास व विनापरवाना रात्रीच्या वेळी लपूनछपून मुरुमाची वाहतूक करीत असताना दोघांनाही पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून चार ट्रॅक्टर व एक जेसिबी असा एकूण २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शिरखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. सदरची कारवाई ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार मनोज टप्पे, छत्रपती करपते, अनूप मानकर, उमेश कुंभेकर, रामेश्वर इंगोले, दीपक गवई यानी केली.

Web Title: Illegal excavation of pimples; Tractor, JCB seized