शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

मेळघाट वन्यजीव विभागात अवैध वृक्षतोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 11:18 IST

Melghat : वनपाल, वनरक्षकाचा सहभाग असल्याचा आरोप, विभागीय वनाधिकाऱ्यांनी मागवला खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा :मेळघाट वन्यजीव विभागातील जामली (वन्यजीव) परिक्षेत्रांतर्गत टॅम्ब्रुसोंडा नियत क्षेत्रामध्ये सागवान वृक्षांची अवैध वृक्षतोड करण्यात आली आहे. यात साग चरपट, साग पाटल्या, साग बल्ल्या मिळून एकूण २८ नग जप्त केले. ०.७४३ घनमीटर असलेल्या या लाकडाची किंमत ६६ हजार ५९४ रुपये दाखविण्यात आली आहे.

अग्निरक्षक रोजंदारी मजूर सुरेश मोती कासदेकर व सोनकलाल चंपालाल दहीकर यांच्या घराच्या आवारातून हे अवैध सागवान जप्त करण्यात आले आहे.रोजंदारी संरक्षण कॅम्प मजूर प्रवीण तुकाराम कासदेकर, शालिकराम भैय्या दहीकर, तेजीलाल चंपालाल दहीकर यांनी त्यांना अवैध वृक्षतोड प्रकरणी सहकार्य केले. या अनुषंगाने भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २६ (१) फ इ व ४१, ४२, ५२ अन्वये २८ एप्रिलला प्रथम गुन्हा जारी करण्यात आला आहे. मेळघाटातून वाढती अवैधरित्या लाकूड वाहतूक थांबविणे हे वनविभागापुढे मोठे आव्हान ठरणारे आहे. 

अशी ही गंमतसामूहिक गस्तीदरम्यान अनेकदा संबंधित वनपाल व वनरक्षक अनुपस्थित राहत होते. स्वतः जवळील जीपीएस मशीन मजुरांना सोपवून ते गस्त करण्यास सांगत होते. गस्ती दरम्यान फक्त फोटो काढून हे वनपाल व वनरक्षक माघारी फिरत होते. ते गस्तीवर येत नसल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले आहे.

वनपालासह वनरक्षकांच्या सांगण्यावरून वृक्षतोड  वनपाल आणि वनरक्षकांच्या सांगण्यावरून अवैध वृक्षतोड करण्यात आल्याचे आरोपींनी आपल्या बयानात स्पष्ट केले आहे. खाट (चारपाई), पलंग व इतर सागवान साहित्य तयार करण्यासाठी साग लाकडे जंगलातून तोडून आणण्यास सांगितल्याचे आरोपींनी आपल्या बयानात सांगितले. यात वनपाल राजेश बाळकृष्ण धुमाळे, वनरक्षक भाग्यश्री भास्कर बिहगीर, सुभाष महाटू शेंडे यांच्या नावांचा उल्लेख आरोपींनी आपल्या बयानात केला आहे.

कारणे दाखवा नोटीससाग वृक्षांच्या अवैध वृक्षतोड प्रकरणात विभागीय वनअधिकारी (मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा) यांनी वनपाल राजेश बाळकृष्ण धुमाळे, वनरक्षक भाग्यश्री बीडगीर, सुभाष महादू शेंडे, सरोस्वती काल्या सेलूकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांचा खुलासा मागविण्यात आला आहे.

संबंधित वनपाल व वनरक्षकांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. खुलासा आल्यानंतर योग्य ती कारवाई प्रस्तावित केल्या जाईल. अवैध वृक्षतोडीचा छडा लावू,- यशवंत बहाळे, विभागीय वनाधिकारी, मेळघाट वन्यजीव विभाग परतवाडा 

टॅग्स :MelghatमेळघाटAmravatiअमरावती