मेळघाटात फोफावतोय अवैध सावकारीचा व्यवसाय

By Admin | Updated: January 6, 2015 22:51 IST2015-01-06T22:51:47+5:302015-01-06T22:51:47+5:30

तालुक्यात अलीकडच्या काळात अवैध सावकारांचा महापूर आला आहे. महिन्याकाठी ५ ते २० टक्के दराने धारणीत वसुली करण्यात येत असून यात सामान्य वर्ग भरडला जात आहे. आपल्या आवश्यक

Illegal business in Philadelphia | मेळघाटात फोफावतोय अवैध सावकारीचा व्यवसाय

मेळघाटात फोफावतोय अवैध सावकारीचा व्यवसाय

श्यामकांत पाण्डेय - धारणी
तालुक्यात अलीकडच्या काळात अवैध सावकारांचा महापूर आला आहे. महिन्याकाठी ५ ते २० टक्के दराने धारणीत वसुली करण्यात येत असून यात सामान्य वर्ग भरडला जात आहे. आपल्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी परवानाधारक सावकारांकडे गेल्यास जाचक अटी व जामीन म्हणून दागिने, शेती व घराचे कागदपत्रे ठेवावे लागत असल्याने काहीही तारण न ठेवता काही बोगस सावकारांकडून प्रचंड प्रमाणात व्याजदर आकारून कर्जवाटप केले जात आहे.
विशेष म्हणजे अशा सावकारांकडे कोणताही परवाना नसतो. केवळ ओळख व एखाद्या जामिनदाराच्या साथीने रोख रक्कम व्याजावर दिली जात आहे. अशा सावकाराद्वारे गरजूकडून ५ ते २० टक्केपर्यंत मासिक व्याजदर आकारला जात असल्याची माहिती आहे. अशा व्यवहाराची कोणतीही लेखी दस्त नसल्याने दोन्ही शेतावर याचा ताबा असतो. मात्र घेणाऱ्यावर तातडीने पैशाची आवश्यकता असल्याने तो व्याजाची पर्वा न करता तात्पुरते काम काढण्यासाठी राजी होतो. मात्र अशा रकमेची परतफेड करताना त्याची चांगलीच दमछाक होते.
धारणी शहराच्या गल्लीबोळातही अवैध सावकारांचे जाळे विणले गेले आहे. अवघे काही हजारावर सुरू केलेल्या अशा व्यावसायिकांना ‘अच्छे दिन’ आले आहे तर उसनवार देणाऱ्यांची मात्र भंबेरी उडत आहे. अशा गल्लीबोळातील सावकारांचे व्याज आठवडी दहा टक्केपर्यंत असल्याची माहीती आहे. प्रसंगी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांकडून आठवडी २० टक्केपर्यंत व्याजाची वसुली केली जात आहे याकरिता राशन कार्ड तारण म्हणून ठेवला जात आहे.

Web Title: Illegal business in Philadelphia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.