पुसल्याच्या आरोग्य उपकेंद्राकडे दुर्लक्षच

By Admin | Updated: July 29, 2016 00:27 IST2016-07-29T00:27:30+5:302016-07-29T00:27:30+5:30

स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला नागरीक कंटाळले आहे.

Ignore the health sub-center of Wool | पुसल्याच्या आरोग्य उपकेंद्राकडे दुर्लक्षच

पुसल्याच्या आरोग्य उपकेंद्राकडे दुर्लक्षच

साथरोग : रूग्णांची हेळसांड, नागरिक त्रस्त
वरुड /पुसला : स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला नागरीक कंटाळले आहे.साथरोगाचा प्रसार होत असून डायरीया, जलजन्य आजार बळावले असताना येथील वैद्यकीय अधिकारऱ्यांनी एकाही आरोग्य उपकेंद्राला भेट दिली नाही. त्यामुळे नागरिकांना उपचार मिळत नाही. दुपारची बाह्यरुग्ण विभागसुध्दा कर्मचारीच सांभाळत असल्याचे सांगण्यात येते. मुख्यालयापासून ३५ ते ४० किमी अंतरावर डोंगराळ भागात हि गांवे असल्याने आरोग्य सेवा मिळत नसल्याची ओरड नागरिकांमध्ये आहे.
पुसला हे गाव सातपुड्याच्या कुशीत वरुड पांढूर्णा राज्यमहामार्गावर असून गावाची लोकसंख्या १६ हजारांपेक्षा अधिक असून या पुसला सर्कलअंतर्गत अनेक आदिवासी गावांचा समावेश आहे. दुपारचा बाह्यरुग्ण विभागात कर्मचारी तपासणी करीत असल्याची खमंग चर्चा आहे. यामध्ये पुसला, लिंगा, कारली, पिपलागढ, जामगांव, महेंद्री, वाई, जामठी, उराड, लोहदरा, एकलविहीर, सावंगी, गणेशपूर धनोडी, मालखेड, करवार सह आदी गावाचा समावेश आहे.
पुसला हा आदिवासीबहूल परिसर आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांंतर्गत २३ हजार लोंकसंख्या आहे. असल्याने पुसला येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून पुसला आणि लिंगा उपकेंद्रसुध्दा आहे. दोन डॉक्टरासह आरोंग्य कर्मचाऱ्याच्या नियुक्ती असून निवासी आहे.कर्मचारी निवासी राहतात मात्र वैद्यकीय अधिकारीच मनामनी कारभार करीत असल्याची चर्चार् आहे. वैद्यकीय अधिकारी राहुल भुतडा मुख्यालयी राहत नसल्याने रात्री बेरात्रीअपघात घडल्यास किंवा गंभीर आजारी झाल्यास मिळेल त्या साधनाने रुग्णांना सरळ वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घ्यावी लागते. पावसाळा सुरू असल्याने जलजन्य आजार तसेच साथीचे आजाराचा प्रकोप असतांना वैद्यकीय अधिकाऱ्यांचह कामचुकारपणा होत असल्याने रुग्ण त्रस्त आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्याचे निवासस्थान भकास पडले असून येथील विद्युत पुरवठासुध्दा खंडित करून घेतल्याचे असल्याचे सांगण्यात येते. दिवसागणिक १५० ते २०० रुग्ण ग्रामीण डोंगराळ भागातून उपचाराकरिता आले असता तपासणीकरीता डॉक्टर उपस्थित राहत नाही. हि शोकांतिका आहे. प्रसुत महिला, सर्पदंश, डायरिया, मलेरिया, तसेच तापाने फणफणत असलेल्या रुग्णांना वरुडला येऊनच उपचार घ्यावे लागते. शासनाच्या पैशाचा दुरुपयोग हासेत असनू नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याचीही चर्चा आहे. डॉक्टरांंच्या हेकेखारीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. येथे घाणीचेसुद्धा साम्राज्य पसरले आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करून जिल्हा आरोग्य विभाग सुस्त असल्याने न्याय कुणाला मागावा, हा प्रश्न आहे.

Web Title: Ignore the health sub-center of Wool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.