शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागात ‘आयएफएस’ विरुद्ध ‘नॉन आयएफएस’ संघर्ष पेटला

By गणेश वासनिक | Updated: June 29, 2024 18:17 IST

आयएफएस लॉबीचे पंख छाटा; कार्यकारी जागा बळकावल्याचा आरोप, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटना एकवटली

अमरावती : राज्याच्या वनविभागातील कार्यकारी पदांवर भारतीय वन सेवा (आयएफएस) लॉबीने बस्तान मांडल्याने महाराष्ट्र सेवेतील वनाधिकाऱ्यांनी (नॉन आयएफएस) आक्षेप घेतला आहे. आयएफएसच्या हाताखाली काम न करता कार्यकारी प्रमुख करण्यासाठी शासनाकडे कैफियत मांडून प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे वनविभागात ‘आयएफएस’ विरुद्ध ‘नॉन आयएफएस’ यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे. मात्र, आता आयएफएस लॉबीचे पंख छाटण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वनाधिकारी संघटना एकवटली, हे विशेष.

राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेंद्र टेंभुर्णीकर यांच्याकडे सादर प्रस्तावानुसार महाराष्ट्र वन सेवेतील ‘डीएफओ’ हे पद पदोन्नतीने वनविभागात अस्तित्वात आहे. यापूर्वी राज्यात आयएफएस उपवनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची संख्या कमी होती. तेव्हा नॉन आयएफएस हे कार्यकारी पदावर काम करायचे. मात्र, राज्याच्या वनविभागात आयएफएस लॉबीने वन्यजीव विभाग, प्रादेशिक संशोधन, अशी पदे खेचल्याने डीएफओ हे पद नावापुरते मर्यादित राहिले आहे. सामाजिक वनीकरण विभागात ३५ पदे असून केवळ या पदावर त्यांची वर्णी लावली जाते. मात्र राज्य सेवेतील वनाधिकाऱ्यांनी सामाजिक वनीकरण विभागात महसुली मुख्यालय आयएफएस नेमण्याची मागणी केली आहे.

 

तालुकास्तरावर ‘नॉन आयएफएस’ला नियुक्ती द्यावनविभागात प्रादेशिक विभागाचे तालुकास्तरावर ४० विभाग असून, या ठिकाणी हल्ली आयएफएस उपवनसंरक्षक कार्यरत आहेत. आता अशा तालुकास्तरीय ठिकाणी ‘नॉन आयएफएस’ नियुक्त करण्याची मागणी आहे. याशिवाय मेळघाट, पेंच, सह्याद्री, उमरेड, नवेगाव नागझिरा, बोर या व्याघ्र प्रकल्पात असलेली आयएफएसची पदे निरस्त करून येथे ‘नॉन आयएफएस’ला संधी देण्याबाबतचा आग्रह करण्यात आला आहे. जिल्हा स्तरावर ‘आयएफएस’ लॉबी काम करेल, तर तालुका स्तरावर ‘नॉन आयएफएस’ असेल, असा प्रस्ताव सादर केला आहे.

 

"महाराष्ट्र राज्य राजपत्रित वनाधिकारी संघटनेचा प्रस्ताव मिळाला आहे. या प्रस्तावाची तपासणी केली जाणार आहे. नेमकी त्यांची मागणी लक्षात घेतली जाईल. त्यानंतर तरतुदीनुसार अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येईल."-शैलेंद्र टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र

 

टॅग्स :forest departmentवनविभागMaharashtraमहाराष्ट्रforestजंगलAmravatiअमरावती