रूग्ण संदर्भित केल्यास आता भूमकांना मानधन
By Admin | Updated: January 3, 2017 00:13 IST2017-01-03T00:13:20+5:302017-01-03T00:13:20+5:30
मेळघाट हे कुपोषणासाठी प्रसिद्ध आहे. पारंपारिक उपचारांवरील आदिवासींची श्रद्धा यामुळे येथे मृत्युदर मोठा आहे.

रूग्ण संदर्भित केल्यास आता भूमकांना मानधन
आरोग्यमंत्र्यांची कार्यशाळा : मेळघाटातील मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न
परतवाडा : मेळघाट हे कुपोषणासाठी प्रसिद्ध आहे. पारंपारिक उपचारांवरील आदिवासींची श्रद्धा यामुळे येथे मृत्युदर मोठा आहे. यावर उपाय म्हणून आता रूग्ण संदर्भित केल्यास भूमकांना प्रतीरूग्ण १०० रूपये मानधन देण्याची घोषणा आरोग्य आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केली.
आदिवासींचा मृत्यूदर कमी हो्त नसल्याने आरोग्य विभागाने याची कारणमिमांसा केली असता पारंपारिक उपचारांकडे असलेला आदिवासींचा कल लक्षात घेऊन मेळघाटातील भूमका भगतांची आरोग्यविषयक कार्यशाळा ३० डिसेंबर रोजी घेण्यात आली. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी भूमका भगत यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांनी रूग्णाला संदर्भित केल्यास १०० रूपये प्रतीरूग्ण असा लाभ देण्याचे जाहीर केले. कार्यशाळेकरिता जिल्हाधिकारी किरण गित्ते, खा.आनंदराव अडसूळ, आ. प्रभुदास भिलावेकर, सुधीर सूर्यवंशी, श्रीपाल पाल, सीईओ किरण कुलकर्णी, आरोेग्य उपसंचालक नितीन अंबाडेकर, उपसंचालक जयस्वाल, प्रकल्प अधिकारी षण्मुगराजन, डीएचओ भालेराव, एडीएचओरनमाळे, जिल्हा शल्य चिकित्सक अरूण राऊत, नरवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी जोगी, प्रधान, उपस्थित होते.