शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

आम्ही मॅनेज झालो असतो, तर.. ; ट्रोल करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:47 IST

Amravati : भाजप सरकारमधील काही लोक आम्हाला बदनाम करण्याचा अजेंडा राबवत आहेत. सोशल मीडियावर ट्रोल करून आमच्याविरोधात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होतोय. पण आम्ही मॅनेज झालो असतो, तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले असते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाएल्गार आंदोलनामुळेच राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची तारीख घोषित केली. आम्ही कर्जमाफीसाठी प्रामाणिकपणे आंदोलन केले, तरीही ट्रोल करून भाजपकडून बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे आता ट्रोल करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारविरुद्ध आंदोलन करावे. असे असले तरी शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारचे ३० जून, तर १ जुलै २०२६ ही आमची असेल, असा निर्वाणीचा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेतून दिला.

भाजप सरकारमधील काही लोक आम्हाला बदनाम करण्याचा अजेंडा राबवत आहेत. सोशल मीडियावर ट्रोल करून आमच्याविरोधात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होतोय. पण आम्ही मॅनेज झालो असतो, तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले असते. मोबाइलवर टीका करण्याऐवजी आंदोलनात उतरले असते, तर शेतकऱ्यांचे भले झाले असते, असा टोला त्यांनी लगावला. मक्याची खरेदी अजून सुरू नाही, सोयाबीनला हमीभाव नाही, दूध उत्पादक संकटात आहेत अशा प्रश्नांवर ट्रोल करणाऱ्यांनी आंदोलन करावे, आम्हीदेखील सहभागी होऊ, असे आव्हान त्यांनी दिले. पत्रकार परिषदेला अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे, बल्लू जवंजाळ, वसू महाराज, बंटी रामटेके, संजय देशमुख, आनंद काळे, अजय मसकरे उपस्थित होते. 

मला आयुष्यातून उठवण्याचा डाव

  • भाजप व त्यांचे सहकारी मला आयुष्यातून उठवण्याचा डाव रचत आहेत. आमच्या आंदोलनाला गालबोट लागले नाही, हेच आमचं यश आहे.
  • काही जण बच्चू कडू आंदोलन करण्याच्या लायकीचा राहू नये, अशी परिस्थिती निर्माण करत आहेत, असा आरोप कडू यांनी केला.
  • दरम्यान, अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्या संपत्तीची चौकशी करावी, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
  • याबाबत विचारले असता, 'हवामहल' बघायला या, तेव्हाच कळेल काय खरं आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
English
हिंदी सारांश
Web Title : If Managed, No Cases; Protest for Farmers: Bachchu Kadu

Web Summary : Bachchu Kadu asserts their movement secured the farm loan waiver date. He challenges critics to protest for farmers' issues like crop prices. Kadu alleges a conspiracy to discredit him, inviting scrutiny of his assets.
टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूBacchu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावतीFarmers Protestशेतकरी आंदोलनfarmingशेती