शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या आशीर्वादाने विजय संपादन केल्यास महाविकास आघाडीलाच पाठिंबा : विक्रम ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 10:58 IST

Amravati : शेंदूरजना घाट येथील सभेत स्पष्ट केली भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्क शेंदुरजना घाट :मोर्शी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विक्रम ठाकरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. शेंदूरजना घाट, मलकापूर या दोन्ही शहरांमध्ये पार पडलेल्या रॅली व सभेत हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेले मतदारांनी विक्रम ठाकरे यांच्या विजयाचे संकेत दिले.

शेंदूरजना घाट गुजरी बाजार याठिकाणी विक्रम ठाकरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. मतदारांना आवाहन करताना विक्रम ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने, मतदारांच्या सहकार्याने मी विजय संपादन केल्यास माझा पहिला पाठिंबा हा महाविकास आघाडीलाच राहील, असे मत त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले. मी काँग्रेसची विचारधारा घेऊन चालणारा कार्यकर्ता असून, माझ्यावर झालेले संस्कार हे मानवतावादी आणि सर्वसमावेशक वृत्तीचे आहे. माझ्यासोबत महाविकास आघाडीचे बहुसंख्येने तळागाळातील कार्यकर्ते जुळलेले असून, मी महाविकास आघाडीसोबत कायम राहणार आहे. सध्या विक्रम ठाकरे विषयी अफवांचा बाजार मांडला जात आहे.

या अफवा पसरविणाऱ्यांनी आजच आपला पराजय मान्य केलेला आहे. माझी अनुक्रमांक १७ नंबरची लिफाफा या चिन्हासमोरील बटन खऱ्या अर्थाने जनतेला विश्वास प्रदान करणारे आहे. मी जनता जनार्दनाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४morshi-acमोर्शीAmravatiअमरावतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी