काटेंना हवे असल्यास त्यांनी न्यायालयात दाद मागावी !
By Admin | Updated: September 14, 2014 01:41 IST2014-09-14T01:41:58+5:302014-09-14T01:41:58+5:30
आमदार डॉ. रणजित पाटील यांच्या विरूद्ध तक्रारकर्तास निवडणुक आयोगाचे उत्तर.

काटेंना हवे असल्यास त्यांनी न्यायालयात दाद मागावी !
अकोला- आमदार डॉ. रणजित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये चुकीची माहिती दिल्याचे तक्रारकर्ता विक्रांत काटे यांना वाटत असल्यास ते योग्य त्या न्यायालयात दाद मागू शकतात, या शब्दात निवडणूक आयोगाने चेंडू टोलवून लावला आहे. विधान परिषदेकरिता उमेदवारी अर्ज भरताना आमदार डॉ. रणजित पाटील यांनी मुलाच्या नावावर असलेली मालमत्ता न दर्शवून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विक्रांत काटे यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्या तक्रारीसंदर्भात आयोगाने ही स्पष्टोक्ती केली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी डॉ. पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे ९ नोव्हेंबर २0११ रोजी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये मुलगा शर्वच्या नावावर असलेली ३२ लाख रुपयांची मालमत्ता दर्शविण्यात आली नसून, ही निवडणूक आयोगाची फसवणूक असल्याची तक्रार घुंगशी येथील विक्रांत काटे यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. दरम्यान काटे यांनी आमदार डॉ. रणजित पाटील यांच्याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगीतले.