शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर येऊ - आमदार रोहित पवार

By उज्वल भालेकर | Updated: November 13, 2023 20:05 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास आम्ही आणि आमचे मित्र पक्षही रस्त्यावर येऊ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेतृत्व आमदार रोहित पवार यांनी सोमवारी अमरावतीमध्ये व्यक्त केली. 

अमरावती: राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन कमी झाले असून खर्च वाढला आहे. परंतु सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. त्यामुळे दिवाळीनंतर प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी मोर्चा काढून सरकारला जाब विचारल्या शिवाय राहणार नाही. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास आम्ही आणि आमचे मित्र पक्षही रस्त्यावर येऊ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेतृत्व आमदार रोहित पवार यांनी सोमवारी अमरावतीमध्ये व्यक्त केली. 

आमदार रोहित पवार हे विदर्भ दौऱ्यावर असून सोमवारी ते अमरावतीमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले जो पवार साहेबांचा दाखला सोशल मीडियावर बाहेर फिरत आहे तो खरा नाही. भाजपा नेहमीच खोट्या गोष्टी पसरवून त्याचे राजकारण करते. त्यांना असत्याचा मार्ग घेऊन सत्तेत येणे एवढाच काय ते समजते. आणि सत्तेत आल्यावर सत्तेचा दुरुपयोग करणे एवढंच भाजपला माहीत आहे. सामान्य लोकांचे प्रश्नांची मात्र त्यांना काहीही घेण देण नाही.लोकसभेच्या आधी हिंदू मुस्लिम होत नाही म्हणून समजा समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपा कडून केला जातो. मराठा आणि ओबीसी सोबतच हिंदू, मुस्लिम होण्याचा प्रयत्न केला जाईल समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपकडून केला जाईल असेही रोहित पवार यावेळी म्हणाले. अजित पवार व शरद पवार परत येतील की नाही तो त्यांचा दोघांचा प्रश्न आहे, मात्र अजित दादांच्या चेहऱ्याकडे पाहून ते नाराज आहे असं जाणवत असून भाजपला लोकनेता पटत नाही असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. 

 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसFarmerशेतकरी