शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

नऊआधी शाळा भरणार, तर मिळणार नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 13:43 IST

Amravati : सकाळी ९ पूर्वी शाळा भरवत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळांवर नियमानुसार कारवाईचा बडगा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीविना सकाळी ९ पूर्वी भरणाऱ्या शाळांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली जाणार आहे. अनेक शाळा नियम करूनही जर सकाळी ९ पूर्वी शाळा भरवत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा शाळांवर नियमानुसार कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. मात्र, अनेक शाळांनी या निर्णयाचे पालन केले नाही. शाळा सकाळी लवकर भरत असल्यास विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नसल्याचा मुद्दा मांडून राज्यपाल रमेश बैस यांनी शाळेची वेळ बदलण्याची सूचना केली होती. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतर भरवण्याबाबत शासननिर्णय प्रसिद्ध केला. या निर्णयाची शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. निर्णयाच्या अंमलबजावणीत अनेक तांत्रिक मुद्देही उपस्थित करण्यात आले. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचालकांनीही या निर्णयाला विरोध केला. शैक्षणिक वर्षात बदल केला आहे, तर काही शाळांनी पालकांशी चर्चा करून वेळ ठरवली. 

काही शाळांनी मात्र या निर्णयाचे पालन केलेले नाही. त्यामुळे शिक्षण विभागाच्या निर्णयाच्या अंमलबजावणी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर, शिक्षण विभागाच्या दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत विषयांबरोबरच शाळेच्या वेळेच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबतही झाली. प्राथमिक शिक्षण संचालकांनी, राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या चौथीपर्यंतच्या शाळा शासनाच्या निर्णयानुसार सकाळी नऊनंतरच भरवणे आवश्यक आहे. सकाळी नऊपूर्वी शाळा भरवायची असल्यास संबंधित शाळांनी सबळ कारण देऊन शिक्षणाधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेतली पाहिजे. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांना परवानगी न घेता सकाळी नऊपूर्वी भरणाऱ्या शाळांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शासनाच्या आदेशाचे पालन योग्य रितीने होणे आवश्यक आहे. ९ पूर्वी शाळा भरवायची असल्यास संबंधित शाळांनी सबळ कारण देऊन शिक्षणाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवानगी जर शाळा ९ पूर्वी भरविली जात असल्यास अशा शाळांवर नियमानुसार कारवाई होईल. इतर चर्चा-बुद्धभूषण सोनवणे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

 

टॅग्स :School Reopening - GuideShalechi TaiyariSchoolशाळाStudentविद्यार्थीAmravatiअमरावती