शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सरकार आल्यास मेळघाटचा चेहरामोहरा बदलणार ! धारणीतील प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 11:05 IST

Amravati : मेळघाटचा बेटा, चिखलदरा येथे आजोळ

लोकमत न्यूज नेटवर्क धारणी: चिखलदरा येथील स्काय वॉक पूर्ण होणार आहे. महायुतीचे सरकार आल्यास मेळघाटचा चेहरामोहरा बदलू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मेळघाट मतदारसंघात महायुतीचे भाजपचे उमेदवार केवळराम काळे यांच्या प्रचारसभेत रविवारी ते बोलत होते. मेळघाटातील समस्यांवर बोलताना फडणवीस म्हणाले, नेर ते खंडवा रस्ता होणार आहे. चुरणी तालुका होण्यासोबतच वनविभागाकडून गोपालकांना कोणताही त्रास होणार नाही. आदिवासींसाठी बिरसा योजनेअंतर्गत चार हजार कोटी खर्च मुंडा करून वीज, रस्ते आणि पाण्याची समस्या दूर होणार आहे. त्याचप्रमाणे शिक्षणासाठी शासन प्रयत्नशील असून, ३५ हजार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळाले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना ४० ते ६० हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करणार आहोत. त्याचप्रमाणे शेतकरी सन्मान निधीची रक्कम १२ हजारांवरून १८ हजार करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी भारतीय जनता पक्ष, शिंदेसेना, अजित पवार गट, युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मेळघाटचा बेटा, चिखलदरा येथे आजोळ नवनीत राणा आपण मेळघाटाची बेटी आहे, तर मीसुद्धा मेळघाटचा बेटा आहे, असे सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आजोबाचे घर चिखलदरा येथे असल्याचे सांगितले. आपण लहानपणी चिखलदरा येथे नेहमी येत होतो. त्यामुळे मीसुद्धा मेळघाटचा बेटा असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४AmravatiअमरावतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmelghat-acमेळघाट