ताप न आल्यास विश्वास बसेना, लस खरी की खोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST2021-09-09T04:17:20+5:302021-09-09T04:17:20+5:30
कोरोनाच्या पहिल्या लाटेत योग्य औषधोपचार तथा लस उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत रुग्ण ...

ताप न आल्यास विश्वास बसेना, लस खरी की खोटी
कोरोनाच्या पहिल्या लाटेत योग्य औषधोपचार तथा लस उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली होती. मात्र, दुसऱ्या लाटेत रुग्ण झपाट्याने वाढले होते. त्यातही अनेकांना जीव गमवावा लागला. परंतु, आरोग्य विभागाद्वारा कोरोना प्रतिबंधक लस निर्माण केल्यामुळे अनेकांना दिलासा मिलाला. सर्वच नागरिकांकरिता शासनाने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध करून दिल्यात. लस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोना झाला. मात्र, त्यांच्या शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढल्याने त्रास कमी झाल्याचे अनुभव अनेकांनी शेअर केला. त्यामुळे जिल्ह्यात एकूण १२ लाख ८ हजार ३७५ नागरिकांनी लसीकरण करून स्वत:ला सुरक्षित करून घेतले. यामध्ये ८ लाख ६७ हजार ३१३ जणांनी पहिला डोस घेतला, तर ३ लाख ४१ हजार ८४७ लोकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. त्यात २ लाख ६१ हजार ५२८ जणांनी कोव्हॅक्सिन आणि ९ लाख ४१ हजार ८४७ लोकांनी कोविशिल्ड लसीचा डोस घेतल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली.
पहिला डोस ८६७३१३
दुसरा डोस ३४१०
दोन्ही डोस १२०८३७५
कोव्हॅक्सिन - २६१५२८
कोविशिल्ड - ९४१८४७
बॉक्स
कोविशिल्डचा त्रास अधिक
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी खऱ्याच आहेत. मात्र, कुणाची प्रतिकारशक्ती असशक्त तर कुणाची कमजोर असल्याने सशक्त रोगप्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तीवर त्याचा असर कमी दाखवितो. यावरून लस खोटी समजणे चुकीचे राहील. कारण दोन्ही लसीचा प्रभाव सारखाच आहे.
बॉक्स
लसीनंतर काहीच झाले नाही
लस घेण्यापूर्वी लोकांचा अनुभव ऐकून मनात भीती वाटत होती. मात्र, मी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला, तेव्हा त्याचा काहीच असर झाला नाही. त्यामुळे मला दिलेली लस खरी की खोटी, असा प्रश्न पडला आहे.
- एक लस धारक
--
मी कोविशिल्डची लस घेतली. मला तीन दिवस ताप, हातपाय दुखले. त्यामुळे मनात भीती वाटला. परंतु शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी घेतलेल्या औषधांचा असर तर होणारच असल्याचे तज्ज्ञांनी सांगितल्यामुळे मनातील भीती निघून गेली.
- एक महिला लसधारक
त्रास झालाच तर परिणामकारक असे अजिबात नाही (कोट)
दोन्ही लसी गुणकारी आहेत. कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोस ८४ दिवसांनी, तर कोव्हॅक्सिनच्या पहिल्या डोसनंतर ६ आठवड्यांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती