- तर ३१ मार्चपूर्वीची कामे रद्द करणार

By Admin | Updated: May 14, 2015 00:02 IST2015-05-14T00:02:16+5:302015-05-14T00:02:16+5:30

चालू आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पापूर्वीे म्हणजेच ३१ मार्च पूर्वी मंजूर करण्यात आलेली विविध विकास कामे निधीअभावी...

- If canceled before March 31 | - तर ३१ मार्चपूर्वीची कामे रद्द करणार

- तर ३१ मार्चपूर्वीची कामे रद्द करणार

निधीची वानवा : आयुक्तांनी सदस्यांना सुनावले
अमरावती : चालू आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पापूर्वीे म्हणजेच ३१ मार्च पूर्वी मंजूर करण्यात आलेली विविध विकास कामे निधीअभावी रखडत असेल तर ती रद्द केली जातील, असे संकेत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिले आहेत.
चालू आर्थिक वर्षांच्या निधी वाटपाचे सूत्र ठरले नसताना मागील अर्थसंकल्पात मंजूर विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत नसेल तर ती कामे कशी? कोठून? करणार असा सवाल उपस्थित करुन आयुक्तांनी ही कामे रद्द करण्याची भाषा सुरु केली आहे. आयुक्तांच्या या पावित्र्याने सदस्य अवाक् झाले आहेत. बहुतांश विकास कामांना ३१ मार्च पूर्वी मंजुरात मिळाली आहे. ही मंजूर कामे त्वरेने सुरु व्हावीत, यासाठी काही सदस्यांनी बुधवारी आयुक्तांचे दालन गाठले. ३१ मार्च पूर्वीच्या विकास कामांना निधी मिळत नसल्याने ती सुरु करता येत नाही, अशी कैफियत या सदस्यांनी आयुक्तांच्या पुढ्यात मांडली. परंतु पैसे नसल्याने कोठून आणणार, त्यापेक्षा ही कामेच रद्द केलेली बरे? असे आयुक्तांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

मोबाईल दुकानांची तपासणी
आयुक्त गुडेवार यांनी बुधवारी उशिरा सायंकाळी शहरातील मोबाईल विक्र ीच्या दुकानांची तपासणी केल्याची माहिती आहे. आयुक्तांना गोपनीय माहिती मिळताच त्यांनी काही मोबाईल विक्रीच्या दुकानांवर धाडसत्र राबविले. कागदपत्रांची एलबीटीसंदर्भात बारकावे तपासली. दुकानदारांना काही सूचनाही केल्याची माहिती आहे.

Web Title: - If canceled before March 31