अंबानाल्याला पूर आल्यास रिटेलिंग वॉल तुटण्याचा धोका
By Admin | Updated: August 8, 2016 23:59 IST2016-08-08T23:59:18+5:302016-08-08T23:59:18+5:30
वडाळी तलाव ओवरफ्लो होऊन अंबानाल्याला पूर आल्यास अंबादेवी मंदिरावजवळील रिटेलिंग वॉल तुटून शहरात पाणी शिरण्याची संभावना आहे.

अंबानाल्याला पूर आल्यास रिटेलिंग वॉल तुटण्याचा धोका
भीती : 'स्ट्रक्चरल आॅडिट' करण्याची मागणी
अमरावती : वडाळी तलाव ओवरफ्लो होऊन अंबानाल्याला पूर आल्यास अंबादेवी मंदिरावजवळील रिटेलिंग वॉल तुटून शहरात पाणी शिरण्याची संभावना आहे. नागरिकांच्या जीवालाही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलाचे महापालिकेने बांधकामाचे स्ट्रकचरल आॅडिट करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महापालिकेने राजकमल-बडनेरा मार्गावरील असलेल्या अंबानाल्यावरील पुलापासुन तर अंबादेवीच्या मंदिराजवळ असलेल्या गांधी चौक ते रविनगरला जोडणाऱ्या पुलापर्यंत नाल्यावर सरळ रेषेत काँग्रेटीकरणाचा स्लॅब टाकून दुकाने काढण्याचे नियोजन महापालिकेचे होते. कालांतराने हा प्लॅन बारगळला. त्यामुळे अंबादेवी मंदिराजवळील अंबानाल्याच्या मधोमध टाकलेले पिल्लर तसेच राहिले आहे. पिल्लरच्या बाजूलाच रिटेनिंग वॉल (संरक्षित भिंत) बांधण्यात आली. नागरिकांच्या घराला नाल्याच्या पुराचा धोका निर्माण होऊ नये व पुराचे पाणी लोकांच्या घरात शिरू नये म्हणून ही रिटेलिंग वॉल महापालिकेने बांधली. त्यामुळे सध्या पुराचा धोका टळला असला तरी काही वर्षांपुर्वी वडाळी तलाव ओहरफ्लो होऊन शहरात मोठी हानी झाली होती. अंबानाल्याचा उपनाला असलेल्या रविनगरातील नाल्याला पूर आल्यामुळे येथील आनंद भांबोरे यांच्या मालकीचे दारुच्या गोदामातात पुराचे पाणी शिरून लाखो रुपयांची दारूसाठा पुरात वाहुन गेले होते. शहरातील १५ मोठे नाले, १६ लहान नाले हे मुख्य अंबानाल्याला मिळत असून पावसाळ्यात या नाल्याला पूर असतो. या पुराची पुनरावृत्ती झाली तर मोठा धोका होऊ शकतो. याकरिता या पुलाचे व स्लॅबच्या बांधकामाचे स्ट्रक्चरल आॅडिट झाल्यास काय सत्य आहे. ते बाहेर निघेल, असे येथील नागरिकांचे मत आहे. (प्रतिनिधी)